महाराष्ट्र

maharashtra

पुण्यात आज 3 हजार 959 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, 6 रुग्णांचा मृत्यू

By

Published : Jan 17, 2022, 7:26 PM IST

राज्यासह पुणे शहरातही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचे वाढत असलेले रुग्ण तर, दुसरीकडे कोरोनाचे देखील वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

पुणे -राज्यासह पुणे शहरातही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचे वाढत असलेले रुग्ण तर, दुसरीकडे कोरोनाचे देखील वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा -MP Sambhaji Raje on Maratha Reservation : मराठा आरक्षणावर योग्य वेळ आल्यावर बोलेन - खासदार संभाजी राजे

पुणे शहरात आज 3 हजार 959 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. पण, आजची संख्या पाहता शहरात आज काहीसा दिलासा मिळाला असल्याचे म्हणावे लागेल.

शहरात दिवसेंदिवस वाढत आहे रुग्णसंख्या

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. दरोरोज 100 ते 150 असे रुग्ण आढळून येत होते. मात्र वाढत जाणारी गर्दी, नागरिकांकडून होणार नियमांचे उल्लंघन यामुळे शहरात आता रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. शहरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचा धोका तर, दुसरीकडे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ही 35 हजार 73 एवढी

पुणे शहरात आज 3 हजार 958 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर, दिवसभरात 3 हजार 67 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आज कोरोनाने 6 मृत्यू झाले आहे. शहरातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ही 35 हजार 73 एवढी झाली आहे.

हेही वाचा -जिनोव्हा बायोफार्मासीटीकल्स कंपनीद्वारे Omicron विरोधातील लसींच्या 2 चाचण्या पूर्ण.. लवकरच मिळेल मान्यता

ABOUT THE AUTHOR

...view details