महाराष्ट्र

maharashtra

येत्या दोन दिवसांत पगार न झाल्यास तीव्र आंदोलन... एसटी कर्मचारी आक्रमक!

By

Published : Nov 9, 2020, 3:35 PM IST

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे पगार अद्याप देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर वेतन देण्याची मागणी जोर धरत आहे.

State transport employee in nashik
येत्या दोन दिवसांत पगार न झाल्यास तीव्र आंदोलन... एसटी कर्मचारी आक्रमक!

नाशिक - येत्या दोन दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा इंटक संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

येत्या दोन दिवसांत पगार न झाल्यास तीव्र आंदोलन... एसटी कर्मचारी आक्रमक!

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने कामागरांचे पगार व्हावे, यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं केली. मात्र परिवहन महमंडळाने अद्याप याची दखल घेतली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा इंटक संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे.

नाशिक एसटी प्रशासन इंटक संघटना आणि कामगार सहाय्यक उपायुक्त यांमध्ये आज बैठक झाली. त्यात लवकरचं एसटी कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची मदत कामगारांना मिळाली नाही. त्यामुळे दोन दिवसांत पगार न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

दिवाळीच्या तोंडावर वेतन देण्याची मागणी जोर धरत आहे.
एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येस सरकार जबाबदार

जळगाव आणि रत्नागिरीत झालेल्या एसटी कामगारांच्या आत्महत्यांना सरकार जबाबदार आहे. जळगावला झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट मिळाली. यामध्ये राज्य परिवहन आणि सरकारला जबाबदार धरण्यात आलं आहे. यानंतरही गांभीर्याने विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इंटक संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details