महाराष्ट्र

maharashtra

काँग्रेस नेत्यांशी संबंधित चार्टर्ड अकाऊंटच्या कार्यालयात ईडीची चौकशी

By

Published : Oct 28, 2021, 6:59 PM IST

नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीराम टॉवर आहे. या इमारतीच्या सहाव्या माळ्यावर मुंबईवरून आलेल्या पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास ईडीचे एक पथक या कार्यालयात दाखल झाले होते. यामध्ये ४ ते ५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चौकशी चार्टर्ड अकाऊंटच्या कार्यालयात सुरू असल्याने याचा नागपुरातील काँग्रेस नेत्यासोबत काय संबंध आहे? या संदर्भात कोणताही खुलासा होऊ शकलेला नाही.

श्रीराम टॉवर
श्रीराम टॉवर

नागपूर -नागपूर शहरातील एका प्रतिष्ठित चार्टर्ड अकाऊंटच्या श्रीराम टॉवर येथील कार्यालयात ईडीच्या पथकाकडून चौकशी केली जात आहे. ज्या कार्यालयात चौकशी सुरू आहे, ते कार्यालय नागपूरच्या काँग्रेस नेत्याशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. कोणत्या कारणाने चौकशी सुरू आहे, या संदर्भात कोणताही खुलासा चौकशी करणाऱ्या पथकाकडून करण्यात आलेला नाही.

नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीराम टॉवर आहे. या इमारतीच्या सहाव्या माळ्यावर मुंबईवरून आलेल्या पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास ईडीचे एक पथक या कार्यालयात दाखल झाले होते. यामध्ये ४ ते ५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चौकशी चार्टर्ड अकाऊंटच्या कार्यालयात सुरू असल्याने याचा नागपुरातील काँग्रेस नेत्यासोबत काय संबंध आहे? या संदर्भात कोणताही खुलासा होऊ शकलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details