महाराष्ट्र

maharashtra

Washim Hijab Controversy : हिजाब व बुरखा घातलेल्या मुलींना प्रवेश नाकारला; सपाचे आमदार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ...

By

Published : Jul 18, 2022, 4:17 PM IST

वाशिममध्ये हिजाब व बुरखा घातलेल्या मुस्लिम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला ( Washim Hijab Controversy ) आहे. त्यावर, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली ( Mla Rais Shaikh On Washim Hijab Controversy ) आहे.

mla rais shaikh on Washim Hijab Controversy
mla rais shaikh on Washim Hijab Controversy

मुंबई - राज्यात 17 जुलै रोजी नीटचा पेपर पार पडला. त्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी पेपर दिला आहे.मात्र, वाशिम येथील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय केंद्रावर हिजाब व बुरखा घातलेल्या मुस्लिम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला ( Washim Hijab Controversy ) आहे. चेहरा व हॉल तिकीट दाखविल्यानंतर देखील त्यांना परीक्षा देऊ दिली नाही, असा आरोप मुलींच्या पालकांनी केला आहे. त्याप्रकरणी वाशिम पोलिसांनीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली ( Mla Rais Shaikh On Washim Hijab Controversy ) आहे.

रईस शेख म्हणाले की, ही घटना निंदनीय आहे. सरकार बदलले आणि ही घटना घडली आहे. एक समाजाला त्रास देणारे आता बाहेर येतील. मी विधानसभेत सांगितले होते, अल्पसंख्याक समाजाला सुरक्षा दिली पाहिजे. मी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहणार आहे. ते तत्काळ कारवाई करतील, अशी मला अपेक्षा आहे. कारण परत अशा प्रकारे महाराष्ट्रात कोणतीही घटना घडणार नाही. त्या मुलींचा हक्क आहे, ती पाहिजेल त्या कपड्यांमध्ये जाऊ शकते, असेही आमदार शेख यांनी म्हटलं.

आमदार रईस शेख यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी

काय आहे प्रकरण? -वाशिममधील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय केंद्रावर नीट परिक्षेचा पेपर पार पडला. यावेळी हजारो विद्यार्थ्यांनी पेपर दिला. मात्र, मुस्लिम विद्यार्थिनींना चेहरा व हॉल टिकिट दाखविल्या नंतर ही हिजाब व बुरखा काढण्यास सांगण्यात आले. तसा आरोप मुस्लिम विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी केला आहे. त्याप्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

'बुरखा काढा नाही, तर...' - पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, इरम मोहम्मद जाकीर व अरिबा समन गझनफर हुसैन या विद्यार्थींसोबत केंद्रातील प्रशासकीय अधिकारी व सदस्यांनी गैरवर्तन केले. बुरखा काढला नाही तर कात्रीने कापावा लागेल. तसेच, रस्त्यावर हिजाब व बुरखा काढायला लावला, असा आरोपही पालकांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा -Washim Hijab controversy - मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब व बुरखा घातल्याने परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारलं !

ABOUT THE AUTHOR

...view details