महाराष्ट्र

maharashtra

Government Financial Help Govinda मृत गोविंदाला दहा लाख रुपयांची मदत; सरकारची घोषणा

By

Published : Aug 23, 2022, 11:02 PM IST

दहीहंडी उत्सवात मृत्युमुखी पडलेल्या संदेश दळवी या तरुणाला मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून दहा लाख रुपयाची मदत करण्यात आली आहे. Government Financial Help Govinda राज्य सरकारने गोविंदा उत्सवात अपघाती मृत्यू आलेल्या गोविंदाला दहा लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य सरकारकडून मृत तरुणांच्या वडिलांच्या नावे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते मदत निधी त्यांच्या वडिलांना देण्यात आला आहे.

मृत गोविंदाला दहा लाख रुपयांची मदत; सरकारची घोषणा
मृत गोविंदाला दहा लाख रुपयांची मदत; सरकारची घोषणा

मुंबई - दहीहंडी उत्सवात मृत्युमुखी पडलेल्या संदेश दळवी या तरुणाला मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून दहा लाख रुपयाची मदत करण्यात आली आहे. राज्य सरकारने गोविंदा उत्सवात अपघाती मृत्यू आलेल्या गोविंदाला दहा लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. Eknath Shinde Govt त्यानुसार राज्य सरकारकडून मृत तरुणांच्या वडिलांच्या नावे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते मदत निधी त्यांच्या वडिलांना देण्यात आला आहे.

सर्व जखमी गोविंदावर योग्य उपचार राज्यात गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा देण्याची तसेच मृत गोविंदांच्या कुटुंबियांना १० लाख, दोन अवयव गमावल्यांना ७.५० लाख, जखमींना ५ लाख रुपये आणि सर्वांवर मोफत उपचाराची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व जखमी गोविंदावर योग्य उपचार व्हावेत, कुणाचाही मृत्यू होऊ नये, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सात अधिकाऱ्यांचे पथक नेमले होते अशी माहिती मुख्यमंत्री शिंद यांनी यावेळी दिली.

मृत्यूमुखी गोविंदांना तत्काळ आर्थिक मदत राज्यभरात जे गोविंदा जखमी झाले त्यांना योग्य उपचार मिळावेत जेणेकरून कुणाचा मृत्यू होऊ नये यासाठी सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच जखमी आणि मृत्यूमुखी गोविंदांना तत्काळ आर्थिक मदत देण्यासंदर्भातही निर्देश देण्यात आले होते असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा -Mahavikas Aghadi Meeting विधान भवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक, उद्धव ठाकरेही होते उपस्थित

ABOUT THE AUTHOR

...view details