महाराष्ट्र

maharashtra

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती

By

Published : Aug 18, 2022, 7:59 PM IST

१२ वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे Mumbai Goa Highway विकास काम अद्याप पूर्ण झाले नसल्याबाबत लक्षवेधी सूचना आज आमदार सुनील प्रभू व इतर सदस्यांनी विधानसभेत मांडली होती. हे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण Public Works Minister Ravindra Chavan यांनी दिली आहे.

Minister Ravindra Chavan
Minister Ravindra Chavan

मुंबई -मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले. महाराष्ट्रातील गेली १२ वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे Mumbai Goa Highway विकास काम अद्याप पूर्ण झाले नसल्याबाबत लक्षवेधी सूचना आज आमदार सुनील प्रभू व इतर सदस्यांनी विधानसभेत मांडली होती. त्या लक्षवेधीला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण Public Works Minister Ravindra Chavan यांनी ही माहिती दिली आहे.



मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा? :मुंबई गोवा- महामार्ग अनेक वर्षापासून मृत्यूचा सापळा बनला असून निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याने आतापर्यंत सुमारे अडीच हजार लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. सदर मुंबई- गोवा महामार्गाचे काम दहा टप्प्यात विभागून देण्यात आले असून त्यापैकी नऊ टप्प्यांच्या कामांची जबाबदारी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. पनवेल ते इंदापूर दरम्यान निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने रस्त्यावर खड्डे पडून अपघात झाले आहेत. या संदर्भामध्ये आज विधानसभा सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावर बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, मुंबई-गोवा महामार्गाचे सर्व काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण केले जाईल.


२५ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवले जातील :गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी २५ ऑगस्टपर्यंत या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले जाईल. त्यानंतर पाहणी दौरा केला जाईल. मुंबई-गोवा महामार्गावरील काम गतीने होण्यासाठी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार केला जाईल. परशुराम घाट आणि कशेडी घाटातील कामकाज अधिक सुरक्षित होण्यासाठी टेरी संस्थेचा सल्ला घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. याबाबतच्या चर्चेत सदस्य सर्वश्री भास्कर जाधव, राजन साळवी, रवींद्र वायकर, नितेश राणे यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा -Raigad Suspected Boat हरिहरेश्वरमधील संशयास्पद बोटीबाबत महत्वाची माहिती, या देशातील असल्याचे निदर्शनास

ABOUT THE AUTHOR

...view details