महाराष्ट्र

maharashtra

Nawab Malik on UP Assembly election: युपीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षासोबत राष्ट्रवादीची युती-नवाब मलिक

By

Published : Jan 13, 2022, 3:11 PM IST

Updated : Jan 13, 2022, 4:15 PM IST

राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik on UP election ) म्हणाले, की समाजवादी पक्ष हा तेथे मोठा पक्ष आहे. त्यामुळे कोणाला सोबत घ्यायचा हा पूर्ण अधिकार समाजवादी पक्षाचा आहे. उत्तर प्रदेशामध्ये शिवसेना 50 ते 100 जागांवर आपले उमेदवार उभे करणार ( Shivsena Independent contest in UP election ) आहे.

नवाब मलिक
नवाब मलिक

मुंबई- उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला सोबत घ्यायचे की नाही, याचा निर्णय समाजवादी पक्ष करणार ( Nawab Malik on Alliance with SP in UP ) आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युती केल्याची माहिती ( NCP alliance with Samajwadi Party ) राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.


राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले, की समाजवादी पक्ष हा तेथे मोठा पक्ष आहे. त्यामुळे कोणाला सोबत घ्यायचा हा पूर्ण अधिकार समाजवादी पक्षाचा आहे. उत्तर प्रदेशामध्ये शिवसेना 50 ते 100 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये शिवसेना स्वबळावर ( Shivsena Independent contest in UP election ) निवडणूक लढवणार असल्याची माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik on UP election ) यांनी दिली.

हेही वाचा-Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha : महेश मांजरेकरांना महिला आयोगाची नोटीस; ट्रेलरही हटवले

महाविकास आघाडीसाठी गोव्यामध्ये काँग्रेस सकारात्मक नाही
महाराष्ट्र राज्य प्रमाणेच गोव्यामध्येही महाविकासआघाडी तयार व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रयत्न करत होती. मात्र, काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमुळे गोव्यामध्ये आघाडी अस्तित्वात येऊ शकत नाही. गेल्या वेळीही गोव्याचा जनतेने भारतीय जनता पक्षाला बहुमत दिले होते. मात्र, काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळेच गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकार आले. त्याच पद्धतीचे गोव्यामध्ये राजकारण सुरू असल्याची टीका नवाब मलिक यांनी गोवा काँग्रेसच्या प्रदेश कमिटीवर ( Nawab Malik slammed Goa Pradesh congress ) केली आहे.

हेही वाचा-Maharashtra Corona : घाबरू नका! फक्त 14 टक्केच लोकं रूग्णालयात; तर 0.32 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर -टोपे

उत्तर प्रदेशमध्ये भाजपमध्ये गळती सुरू-

उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अनेक चर्चांना उधाC येत असताना 15 दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये फक्त भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार, अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, गेल्या 15 दिवसांमध्ये उत्तर प्रदेशचे चित्र बदलले आहे. उत्तर प्रदेशमध्ये (UP Minister And MLA Resign ) भारतीय जनता पक्षाच्या सरकारमधील मंत्री आणि आमदार एकामागोमाग एक राजीनामे देत आहेत.

Last Updated : Jan 13, 2022, 4:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details