महाराष्ट्र

maharashtra

Khambhatki Ghat : खंबाटकी बोगद्याचे पुढच्या वर्षी होणार काम पूर्ण, 45 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटात होणार

By

Published : Jul 7, 2022, 1:28 PM IST

Updated : Jul 7, 2022, 2:19 PM IST

पुणे-सातारा महामार्गावरील (Pune Satara Highway) खंबाटकी (Khambhatki Ghat) घाटातील नवीन सहापदरी बोगद्याचे (Tunnel) काम प्रगतीपथावर असून पुढील वर्षी मार्च महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ट्विटवरून जाहीर केले आहे.

महामार्ग
महामार्ग

नवी दिल्ली :सातारा या राष्ट्रीय महामार्ग (Satara Highway) क्र. 4 वर प्रत्येकी 3 मार्गिका असलेल्या दुहेरी बोगद्याचे काम सुरु आहे. इंग्रजी वर्णाक्षर एसप्रमाणे असलेल्या वळणमार्गाचे कामही लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे या मार्गावर होणार्‍या अपघातांमध्ये मोठी घट होईल, असा विश्वास नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) आपल्या ट्विटर संदेशात व्यक्त केला आहे.



बोगद्यातील प्रवास होणार 10 मिनिटात-प्रवासावेळी बोगद्यात (Tunnel) 45 मिनिटांचा वेळ लागतो तर सातारा-पुणे (Pune-Satara) प्रवासादरम्यान बोगद्यात 10 ते 15 मिनिटांचा वेळ लागतो. मात्र, नवीन सहापदरी बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर केवळ 5 ते 10 मिनिटात या बोगद्यातून प्रवास करता येईल. 6.43 किलो मीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी अंदाजे 926 कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे.

माझ्याकडे निधीची कमतरता नाही - शहरात नाविन्यपूर्ण कामे सुरू आहेत. यासाठी कितीही निधी लागला तरी तो केंद्र सरकार कडून दिला जाईल. राज्यात कुठलेही सरकार आले तरी माझ्या कामांमध्ये पैशाची अडचण येत नाही. तसेच, यावेळी राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर कोणतेही व्यक्तव्य करण्यास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नकार दिला ( nitin gadkari no comment on maharashtra political crisis ) आहे.

देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांची भेट-राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आशीर्वाद घेतला. फडणवीस नागपूरला आले असता नितीन गडकरी हे दिल्लीत होते, त्यामुळे या दोन नेत्यांची भेट होऊ शकली नव्हती. मात्र, काल दुपारी देवेंद्र फडणवीस मुंबईला जाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर दाखल झाले असता त्याचवेळी नितीन गडकरी हे देखील दिल्लीवरून नागपूरला आले असता दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांचा आशीर्वाद घेतला, तर गडकरी यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा:CM Eknath Shinde Takes Charge : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्रालयात पदभार स्वीकारला

Last Updated : Jul 7, 2022, 2:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details