महाराष्ट्र

maharashtra

12 MLC Issue : राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांना आमदार नियुक्तीसाठी पत्र?

By

Published : Apr 19, 2022, 4:58 PM IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना एक पत्र देण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये सहा नावांची शिफारस ( Appointment of 12 MLA Issue ) राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. २९ सप्टेंबर २०२० रोजी राज्यपालांचे हे पत्र मुख्यमंत्र्यांना ( Governor letter to Chief Minister Uddhav Thackeray ) लिहिण्यात आलेले आहे.

मुख्यमंत्री आणि राज्यपाल संग्रहित छायाचित्र
मुख्यमंत्री आणि राज्यपाल संग्रहित छायाचित्र

मुंबई - राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असताना आता एक नवीन माहिती समोर आलेली आहे. २९ सप्टेंबर २०२० मध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना एक पत्र देण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये सहा नावांची शिफारस राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. २९ सप्टेंबर २०२० रोजी राज्यपालांचे हे पत्र मुख्यमंत्र्यांना ( Governor letter to Chief Minister Uddhav Thackeray ) लिहिण्यात आलेले आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेल्या १२ आमदारांची नियुक्ती ( Appointment of 12 MLA Issue ) राज्यपालाकडून रखडली असताना आता हे सप्टेंबर २०२० मधील राज्यपाल यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र समोर आल्याने नवीन विषय चर्चिला जात आहे.


सहा नावे कोणती ? :१) वीरभद्रेश्वर बसवंती (सामाजिक), २) रमेश बाबुराव कोकाटे (राजकीय), ३) सतीश रामचंद्र घरात (उद्योग), ४) संतोष अशोक नाथ (सामाजिक), ५) मोरेश्वर महादेव भोंडवे (राजकीय), ६) जगन्नाथ शिवाजी पाटील (सामाजिक) या सहा नावांची शिफारस राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. परंतु आता सूत्रांच्या माहितीनुसार हे पत्र बनावट असल्याची माहिती राज भवनकडून देण्यात आल्याचे समजते.

हेही वाचा -Dilip Walse Patil on law and order : महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचे काम होत आहे - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details