महाराष्ट्र

maharashtra

Congress leaders to meet CM : काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला; निधी वाटप वादावर चर्चा?

By

Published : Feb 17, 2022, 2:54 PM IST

Updated : Feb 17, 2022, 5:53 PM IST

काँग्रेसच्यावतीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट (Congress Leaders Meet CM Thackeray) घेण्यात येणार आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांकडे विकास निधी आणि अन्य काही प्रश्नांबाबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

congress
महाराष्ट्र काँग्रेस

मुंबई -काँग्रेसच्या आमदारांना पुरेसा विकास निधी मिळावा यासाठी आज काँग्रेसचे नेते (Congress Leaders) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. यासंदर्भातली माहिती काँग्रेस नेते व मंत्री बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया देताना मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

काँग्रेसच्यावतीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात येणार असून, ही सदिच्छा भेट असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांकडे विकास निधी आणि अन्य काही प्रश्नांबाबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

  • भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग

भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात येत आहे. याविरोधात आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. मुलांवरही आरोप केले जात असून ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Feb 17, 2022, 5:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details