मुंबई -थंडीत राज्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार झाले आहे. राज्याच्या काही भागात आज आणि उद्या जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने ( Chance of Rain in MAHA ) वर्तविली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने वातावरणात बदल झाला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यांसह पुढील 3 दिवस ( Rain with Thunderstorm in next 3 days ) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. उद्या पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा ( Orange alert in Maharashtra Four districts) इशारा देण्यात आला असल्याचे हवामान तज्ञ शुभांगी भुत्ते यांनी सांगितले.
'या' भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता -
राज्य अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहेत. आज अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहेत व याची तीव्रता 48 तासात वाढणार आहे. यामुळे २ डिसेंबर या कालावधीत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत काही भागात पावसाची शक्यता आहे. आता तीन दिवस पावसाचे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्याच्या अनेक भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता -