महाराष्ट्र

maharashtra

Nawab Malik On OBC Reservation : सामाजिक आरक्षण संपवण्याचे भाजपचे कारस्थान -नवाब मलिक

By

Published : Dec 17, 2021, 10:56 AM IST

Updated : Dec 17, 2021, 12:26 PM IST

आरक्षणाविरोधात न्यायालयात जाणाऱ्या वकिलांना भाजपची छुपी मदत आणि आर्थिक पाठबळ आहे. महाविकास (Supreme Court OBC Reservation ) आघाडीच्या विरोधात न्यायालयात जाणाऱ्या लोकांना पैसे पुरविण्याचे काम भाजपकडून केले जाते (OBC Reservation 2021) असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक

मुंबई -मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला विरोध करत देशातून सामाजिक आरक्षण संपविण्याचे भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. ( Nawab Malik On OBC Reservation) भाजपाचे हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.


आरक्षण विरोधकांना भाजपाची फुस- मलिक

आरक्षणाविरोधात न्यायालयात जाणाऱ्या वकिलांना भाजपची छुपी मदत आणि आर्थिक पाठबळ आहे. (OBC Reservation SC) महाविकास आघाडीच्या विरोधात न्यायालयात जाणाऱ्या लोकांना पैसे पुरविण्याचे काम भाजपकडून केले जाते. असा आरोप करीत भाजपच्या पाठबळावर हरिश साळवे यांच्यासारखे मोठे वकील नेमले जातात. असे मलिक यांनी सांगितले.

मागासवर्ग आयोगाला बळकटी देणार

राज्य सरकारने नेमलेल्या मागासवर्ग आयोगाला निधी, मनुष्यबळ आणि इतर साधनसामुग्री देण्यासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे. आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी राज्य सरकारची भूमिका आहे तसा ठरावही मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे.

कोर्टाची किंवा संसदेची दिशाभूल केलेली आहे

केंद्र सरकारच्यावतीने संसदेच्या पटलावर ओबीसींच्या संदर्भातील इम्पिरिकल डेटा ९७ टक्के योग्य असल्याचे सांगितले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने हाच डेटा योग्य नसून, यावरुन ओबीसींची संख्या ठरवता येत नसल्याचे सांगितले. म्हणजे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची किंवा संसदेची दिशाभूल केलेली आहे. याविषयी संसदेत सरकारला जाब विचारण्याचे काम पक्षामार्फत करणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेला निकाल केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत राहणार नाही. तो निर्णय देशभरासाठी लागू होतो. त्यामुळे संपुर्ण देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, अशी भीतीही मलिक यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -Alia Bhatt: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट अडचणीत! कोरोना नियमांचे उल्लघंन केल्याने दाखल होऊ शकतो FIR

Last Updated : Dec 17, 2021, 12:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details