महाराष्ट्र

maharashtra

Car-Container Accident : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू तर 8 जण जखमी

By

Published : Nov 21, 2021, 10:58 PM IST

Updated : Nov 21, 2021, 11:30 PM IST

भाविक प्रवास करत असलेल्या इको कार आणि कंटेनरची मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आवंढणी गावानजीक जोरदार घडक झाल्याने भीषण अपघात घडला आहे. सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती मनोर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. अपघात घडला त्यावेळी वाहनांमध्ये एकूण बारा जण प्रवास करीत होते. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी आहेत. यातील 2 जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याचे माहिती आहे.

अपघात
अपघात

पालघर - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) आवंढणी गावानजीक कार आणि कंटेनरमध्ये भीषण (car and container accident) अपघात घडला. यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 8 जण जखमी झाले असून त्यांना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हेमंत तरे (वय -६०), सुषमा आरेकर (वय -३२), चालक राकेश तमोरे (वय-४२), सर्वज्ञा आरेकर (वय-०२) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. तर तृप्ती तामोरे (वय ३५), रमेश आरेकर (वय ५४) या दोघांची प्रकृती गंभीर असून हर्षद तरे (वय २७), भव्या आरेकर (वय ४), महेश आरेकर (वय ३९), सुनील तामोरे (वय ४०), आकाश पाटील (वय २५), जयेश तामोरे (वय ०३) हे सहाजण जखमी झाले आहेत.

एकवीरा मातेचे दर्शन घेऊन पालघर तालुक्यातील बोईसर दांडी येथे परतत असताना भाविकांवर काळाने घाला घातला आहे. भाविक प्रवास करत असलेल्या इको कार आणि कंटेनरची मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आवंढणी गावानजीक जोरदार घडक झाल्याने भीषण अपघात घडला आहे. सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती मनोर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. अपघात घडला त्यावेळी वाहनांमध्ये एकूण बारा जण प्रवास करीत होते. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी आहेत. यातील 2 जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याचे माहिती आहे.

हेही वाचा -cousin Murder : अर्ध्या एकर शेतीच्या वादातून दगडाने ठेचून चुलत भावाची केली हत्या

Last Updated :Nov 21, 2021, 11:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details