महाराष्ट्र

maharashtra

4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी 2 दोषींना 20 वर्षाची शिक्षा

By

Published : Dec 9, 2020, 10:40 AM IST

मुंबईतील राफीबहामंड किडवाई मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षांपूर्वी एका 4 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणातील दोन दोषींना 20 वर्षांची शिक्षा विशेष पोस्को न्यायालयाने सुनावलेली आहे.

4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी 2 आरोपीना 20 वर्षाची शिक्षा
4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी 2 आरोपीना 20 वर्षाची शिक्षा

मुंबई- मुंबईतील राफीबहामंड किडवाई मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षांपूर्वी एका चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाले होते. माचीसचा धाक दाखवून्या दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या तीनपैकी दोन आरोपींना 20 वर्षाची शिक्षा विशेष पोस्को न्यायालयाने सुनावलेली आहे. या प्रकरणातील एक अल्पवयीन आरोपी असून त्याच्यावर बाल न्यायालयामध्ये खटला चालवण्यात येणार आहे.

मुलीची साक्ष धरण्यात आली ग्राह्य
दोन वर्षापूर्वी एका चार वर्षांच्या मुलीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या तिघांनी लैंगिक अत्याचार केले होते. हे तिन्ही आरोपी सदर मुली सोबत नेहमी खेळत असायचे. या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर हे आरोपी जागेवरून फरार झाले होते. मात्र चार वर्षाच्या मुलीने तिच्यावर घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला त्यानंतर त्यासंदर्भात आरएके मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर चार वर्षाच्या मुलीने दिलेल्या साक्षीवर न्यायालयाने या दोषींना वीस वर्षांची शिक्षा सुनावली आहे. चार वर्षाची मुलगी ही निष्पाप असून तिने दिलेली साक्ष ही ग्राह्य धरत ही शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details