महाराष्ट्र

maharashtra

Governor Appointed 12 MLA Issue राज्यपाल नियुक्त जागांसाठी रस्सीखेच, शिंदे गटाला ४ जागा मिळण्याती शक्यता

By

Published : Aug 23, 2022, 3:21 PM IST

राज्यपाल नियुक्त १२ नावावरून महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष रंगला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis यांच्याकडून लवकरच १२ नावे राज्यपालांना पाठवणार आहे. या १२ नावांसाठी Governor appointed 12 MLA Issue दोन्हीकडून जोरदार लॅाबिंग सुरू झाली आहे. विधिमंडळातील संख्याबळनुसार भाजपाला १२ पैकी ८ तर शिंदेगटाला ४ जागा 4 seats for Shinde group मिळण्याची शक्यता आहे.

विधानसभा
विधानसभा

मुंबई -गेली अडीच वर्षे राज्यपाल नियुक्त १२ जागांना मान्यता देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे गट आणि भाजपाने १२ जागांसाठी यादी तयार केली असून लवकरच राज्यपालांकडे पाठवली जाणार आहे. राज्यपाल नियुक्त १२ नावावरून महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष रंगला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis यांच्याकडून लवकरच १२ नावे राज्यपालांना पाठवणार आहे. या १२ नावांसाठी Governor appointed 12 MLA Issue दोन्हीकडून जोरदार लॅाबिंग सुरू झाली आहे. विधिमंडळातील संख्याबळनुसार भाजपाला १२ पैकी ८ तर शिंदेगटाला ४ जागा 4 seats for Shinde group मिळण्याची शक्यता आहे.



महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी १२ जणांची यादी दिली होती. राज्यपालांना ती शेवटपर्यंत मंजूर केली नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतानाही १२ आमदारांच्या मुद्द्यावरुन राज्यपालांना टोला लगावला होता. आता ही नावे कधी पाठवणार आणि कोणा कोणाला संधी मिळणार? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. २०१९ च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या तसेच शिंदे आणि फडणवीसांवर विश्वास ठेवत पक्षात आलेल्या लोकांना जास्त संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच विधानपरिषदेची टर्म संपलेलीही अनेक जण लॅाबिंग करत आहेत. शिंदे गटातून विजय शिवतारे, राजेश क्षीरसागर, नरेश म्हस्के, चंद्रकांत रघुवंशी, किरण पावसकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -Maharashtra Assembly Session 2022 अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

ABOUT THE AUTHOR

...view details