महाराष्ट्र

maharashtra

Kolhapur District Bank Election : 40 केंद्रांवर बुधवारी पार पडणार जिल्हा बँकेचे मतदान; 33 उमेदवार रिंगणात

By

Published : Jan 4, 2022, 6:56 PM IST

Updated : Jan 4, 2022, 7:54 PM IST

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ( Kolhapur District Central Co-operative Bank ) निवडणुकीसाठी उद्या ( बुधवारी ) एकूण 40 केंद्रावर मतदान होणार ( Voting at 40 Centers ) आहे. ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.

निवडणूक तयारी
निवडणूक तयारी

कोल्हापूर -कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ( Kolhapur District Central Co-operative Bank ) निवडणुकीसाठी उद्या ( बुधवारी ) एकूण 40 केंद्रावर मतदान होणार ( Voting at 40 Centers ) आहे. त्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. एकूण 21 जागांपैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या 15 जागांसाठी ही निवडणूक होत असून उद्या या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद होणार आहेत. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून मतपेट्या मतदान केंद्रावर रवाना झाल्या आहेत.

उद्या पार पडणार जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया
  • 33 उमेदवार रिंगणात, 7 जानेवारीला मतमोजणी

जिल्हा बँकेच्या एकूण 15 जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी निवडणूकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतपेट्या सुद्धा अनेक मतदान केंद्राकडे रवाना झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 40 केंद्रांवर मतदान होणार असून एका केंद्रावर 150 ते 250 मतदारांना मतदान करता येणार आहे. जिल्हा बँकेत एकूण 7 हजार 651 इतके मतदार आहेत. त्यातील प्रत्येकाला 5 मतांचा अधिकार असल्याने मतपत्रिका सुद्धा तशा पद्धतीने असणार आहेत. दरम्यान निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून उद्या मतदान होणार आहे. शुक्रवारी 7 जानेवारी रोजी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. येथील शासकीय बहुद्देशीय हॉल येथे ही मतमोजणी होणार आहे.

  • जिल्ह्यातले राजकारण ढकलले

जिल्ह्यात 21 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ तसेच पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह दिग्गजांचा समावेश आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वच नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र शिवसेनेने 3 जागांसाठी केलेली मागणी तसेच आमदार विनय कोरे यांनी बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी न देण्यावरून चर्चा फिस्कटत चालली. शेवटी काँग्रेस राष्ट्रवादीने भाजपा आणि मित्रपक्षांसोबत हातमिळवणी करत शिवसेनेने स्वतःचे पॅनेल जाहीर केले. त्यामुळे कालपर्यंत एकमेकांबद्दल स्तुती करणारे नेते टीका करताना पाहायला मिळाले. जिल्हा बँकेच्या निमित्ताने स्वकीयांवरच आरोप-प्रत्यारोप, टीका सुरू झाल्या. काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या मतदान होत आहे. 33 जनांपैकी मतदार नेमक्या कोणत्या 15 उमेदवारांना निवडणार हेच पाहावे लागणार आहे.

हेही वाचा -Pune Bank Election: मला तिथे डाऊट होताच, माहिती घेऊन काय गडबड झाली हे पाहणार - अजित पवार

Last Updated : Jan 4, 2022, 7:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details