अमरावती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये आज ( 8 मे ) सभा घेणार ( Cm Uddhav Thackeray Aurangabad Sabha ) आहेत. मात्र, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत राजकीय सभा घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या जनतेच्या समस्या जाणून घ्याव्यात, असा सल्ला खासदार नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना ( Nanveet Rana On Cm Uddhav Thackeray ) दिला आहे. त्या अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
'निधीसाठी मागितली जाते टक्केवारी' - नवनीत राणा म्हणाल्या की, केवळ अपक्ष आमदार नव्हे तर सर्वच आमदारांना त्यांच्या मतदारसंघात कामासाठी निधी हवा असेल, तर त्यासाठी मंत्र्यांकडून टक्केवारी मागितली जाते. आज सर्व आमदारांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर, मुख्यमंत्री आमची भेट घेत नाही, आमच्या समस्या जाणून घेत नाही. मंत्री, राज्यमंत्री निधीसाठी टक्केवारी मागतात, असेच सर्व सांगतील, असे देखील राणांनी म्हटलं आहे.
नवनीत राणा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना 'राज्यसभा निवडणुकीमुळे दबाव' -अपक्ष आमदार रवी राणा यांना राज्यसभा निवडणुकीत सहभागी होता येऊ नये, म्हणून शिवसेनेकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. यामुळेच न्यायालयाच्या माध्यमातून रवी राणा यांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याचा आरोपही नवनीत राणांनी केला आहे.
'न्यायालयाचा आदर मात्र आधी मतदारांची समस्या सोडवणार' -मला हजर राहण्यास सांगितले तर मी न्यायालयाचा आदर राखून नक्कीच हजर होईल. आज मला न्यायालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आले. मात्र, आमच्या अमरावती जिल्ह्यात सध्या पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक त्रस्त आहे. मी केंद्राकडून मिळालेल्या तीनशे कोटी निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाण्याची समस्या सोडविली आहे?, असे असताना पाणी टंचाई का निर्माण झाली या संदर्भात जीवन प्राधिकरण विभागाची बैठक बोलाविली आहे. आधी मतदारांच्या समस्या सोडविणे माझे कर्तव्य असून, यानंतर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार, असे देखील खासदार नवनीत राणा यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -Pankaja Munde : फडणवीसांशी 'पंगा' पंकजा मुंडेंना नडला..? राज्यसभेनंतर विधानपरिषदेचीही उमेदवारी नाहीच