महाराष्ट्र

maharashtra

Today Petrol Diesel Rates: पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर, जाणून घ्या कुठे मिळेल स्वस्त पेट्रोल?

By

Published : Feb 8, 2023, 6:34 AM IST

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती सध्या चांगली दिसून येत नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. परंतु याही परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्था अजूनही स्थिर आणि चांगली आहे. आज मुंबईत पेट्रोलचा दर 160.31 रुपये आहे, तर डिझेलचा भाव 94.27 रुपये आहे.दरम्यान, पुण्यात पेट्रोलचा दर 106.70 रुपये असून, डिझेल 93.19 रुपयांवर आहे. आजचे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेवू या.

Today Petrol Diesel Rates
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या खिशावर होत आहे. आज देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. भारत सर्वाधिक कच्चे तेल आयात करणारा देश आहे. परिणामी काही राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीसा बदल झाला आहे. पहा तुमच्या शहरांतील आजचे दर काय आहेत ते पाहा.

शहरांतील आजचे दर: नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 43 पैसे, तर डिझेलचा दर 92 रुपये 94 पैसे आहे. मुंबईमध्ये काय बदल झाला आहे? मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे. तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 14 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 69 पैसे. यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दरात 106 रुपये 49 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 04 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 70 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 19 पैसे आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर

पेट्रोल-डिझेलची प्रतिलिटर किंमत : तेल शुद्धीकरण कारखान्यातून कच्चे तेल बाहेर पडल्यानंतर त्याची मूळ किंमत नक्की केली जाते. इंधनाची ही मूळ किंमत प्रतिलिटर अशी निश्चित असते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर, शुद्धीकरणाचा खर्च आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी इत्यादी घटक त्यासाठी विचारात घेणे गरजेचे असते. शुद्धीकरण केलेले इंधन प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर पोहोचेपर्यंत त्यात अनेक खर्च जोडले जातात. या खर्चांमध्ये तेल वाहतुकीचा खर्च, केंद्र आणि राज्यांचे कर आणि डीलरचे कमिशन यांचा समावेश असतो. या सगळ्यांची एकत्रित बेरीज करून प्रत्यक्ष पंपावर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलची प्रतिलिटर किंमत ठरवण्यात येते. सर्व खर्च अंतिमत: ग्राहकाकडून वसूल करण्यात येतो. भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम अशा बहुतेक तेल कंपन्या या सरकारी मालकीच्या म्हणून ओळखल्या जातात.

चार प्रमुख तेलक्षेत्रे: पेट्रोल जमिनीखाली आणि समुद्राखाली दोन्ही ठिकाणी आढळते परंतु ते केवळ विशिष्ट ठिकाणीच आढळते. भारतातील तेल क्षेत्रे कोणती आहेत? भारतात फक्त चार प्रमुख तेलक्षेत्रे आहेत. ज्यांची नावे आहेत आसाम किंवा ब्रह्मपुत्रा व्हॅली ऑइल फील्ड, वेस्टर्न ऑफशोर फील्ड, ईस्टर्न ऑफशोर ऑइल फील्ड, गुजरात कोस्ट ऑइल फील्ड.

हेही वाचा : Today Petrol Diesel Rates: पेट्रोल डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या शहरांतील आजचे दर

ABOUT THE AUTHOR

...view details