महाराष्ट्र

maharashtra

जाणून घ्या, सोने-चांदीचे आजचे दर

By

Published : Nov 3, 2020, 5:57 PM IST

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ५५ रुपयांनी वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढून प्रति औंस १,८९४ डॉलर आहे. चांदीचा दर स्थिर राहून प्रति औंस २४ डॉलर आहे.

संग्रहित
संग्रहित

नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा ५५ रुपयांनी वाढून ५०,७३५ रुपये आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीमुळे सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ५०, ६८० रुपये होता. चांदीचा दर प्रति किलो १७० रुपयांनी वाढून ६१,७८० रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६१,६१० रुपये आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ५५ रुपयांनी वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढून प्रति औंस १,८९४ डॉलर आहे. चांदीचा दर स्थिर राहून प्रति औंस २४ डॉलर आहे.

शेअर बाजारात तेजी-

जागतिक बाजारातील सकारात्मक स्थिती आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५०३.५५ अंशाने वधारून ४०,२६१.१३ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १४४.३५ अंशाने वधारून ११,८१३.५० वर स्थिरावला.

ABOUT THE AUTHOR

...view details