महाराष्ट्र

maharashtra

चांदी प्रति किलो ९०२ रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या, सोन्याचे दर

By

Published : Jul 8, 2021, 5:59 PM IST

झेन सिक्युरिटीजचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सतीश कनथेटी यांच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारातील अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य आणि सोन्याची किंमत यांचे व्यस्त प्रमाण असते. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जसे डॉलरचा दर वधारतो, तसे सोन्याच्या किमती घसरतात.

gold rate
सोने दर

नवी दिल्ली- दिल्लीत चांदीचे दर प्रति किलो 902 रुपयांनी कमी होऊन 67,758 रुपये झाले आहेत. यापूर्वी चांदीचा दर प्रति किलो 68,660 रुपये होता.

दिल्लीत सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा 9 रुपयांची वाढ होऊन दर 46,981 रुपये आहे. जागतिक बाजारातील सोन्याच्या दरात झालेली वाढ आणि रुपयाच्या मूल्यात झालेली घसरण या कारणांनी देशातील सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 46,972 रुपये होता.

हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळ खाते वाटप; जाणून घ्या, नवीन मंत्र्यांकडे कोणते सोपविले मंत्रालय

गुरुवारी रुपयाचे मूल्य हे बाजार खुला होताना डॉलरच्या तुलनेत 17 पैशांनी घसरले आहे. या घसरणीमुळे एका डॉलरसाठी 74.79 रुपये मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वधारून प्रति औंस 1,807 डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस 26 डॉलर आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले, की डॉलरची स्थिती बळकट आहे. अशा स्थितीत सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात 1800 डॉलरहून अधिक आहे.

हेही वाचा-देशातील कायद्याचे प्रत्येकाने पालन करावे, अश्विनी वैष्णव यांचा ट्विटरला सूचक इशारा

सोन्याच्या किमती अशा ठरतात!

झेन सिक्युरिटीजचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सतीश कनथेटी यांच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारातील अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य आणि सोन्याची किंमत यांचे व्यस्त प्रमाण असते. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जसे डॉलरचा दर वधारतो, तसे सोन्याच्या किमती घसरतात. तर डॉलरचे मूल्य घसरल्यानंतर सोन्याच्या किमती वाढायला लागतात. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने काही संकेत दिल्यानंतर अलीकडे सोन्याच्या किमती घसरल्याचे कानथेटी यांनी ईटीव्ही भारतला बोलताना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details