महाराष्ट्र

maharashtra

सोने दरात पुन्हा घसरण; 'हे' आहे कारण

By

Published : Jul 27, 2021, 7:27 PM IST

सोन्यापाठोपाठ चांदीचे दर घसरले आहेत. चांदीचे दर प्रति किलो 206 रुपयांनी घसरून 65,710 रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 65,916 रुपये होता.

नवी दिल्ली - सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा 123 रुपयांनी घसरून 46,505 आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्याने हा परिणाम झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 46,628 रुपये होता. सोन्यापाठोपाठ चांदीचे दर घसरले आहेत. चांदीचे दर प्रति किलो 206 रुपयांनी घसरून 65,710 रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 65,916 रुपये होता.

हेही वाचा-पश्चिम बंगालचे नाव बदला- ममता बॅनर्जी यांची पंतप्रधानांच्या भेटीत मागणी

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर घसरून प्रति औंस 1,795 डॉलर आहे. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस 25.16 डॉलर आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे सोन्याचे दर 1,800 डॉलरहून कमी राहिले आहेत. अमेरिकेच्या फेडरल ओपन मार्केट कमिटीची (Federal Open Market Committee) बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी गुंतवणूकदार आणि ट्रेडरने सावधानतेचा पवित्रा घेतला आहे.

हेही वाचा-VIDEO हत्तीच्या कळपासमोर आरडाओरड करणे पडले महागात; कॅमेरासमोरच कामगाराला केले ठार

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटीज रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले, की सोन्याचे दर स्थिर होते. मात्र, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या बैठकीपूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details