महाराष्ट्र

maharashtra

सोन्याच्या दरात प्रति तोळा ३३५ रुपयांची वाढ

By

Published : Jan 5, 2021, 8:32 PM IST

चांदीचा दर प्रति किलो ३८२ रुपयांनी वाढून प्रति किलो ६९, ६९३ रुपये आहे. चांदीचा दर मागील सत्रात प्रति किलो ६९,३९१ रुपये होता.

सोने दर न्यूज
सोने दर न्यूज

नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा ३३५ रुपयांनी वधारून ५०,९६९ रुपये आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ५०,६३४ रुपये होता.

सोन्याच्या पाठोपाठ चांदीचे दरही वधारले आहेत. चांदीचा दर प्रति किलो ३८२ रुपयांनी वाढून प्रति किलो ६९, ६९३ रुपये आहे. चांदीचा दर मागील सत्रात प्रति किलो ६९,३९१ रुपये होता.

हेही वाचा-खाद्यतेल कंपनीकडून सौरव गांगुलीची जाहिरात काही काळाकरता बंद

रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत १३ पैशांनी घसरले आहे. त्यामुळे एका डॉलरसाठी ७३.१५ चलनाचा विनिमय दर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यासह चांदीचे दर स्थिर राहिले आहेत.

हेही वाचा-स्टेट बँकेचे ३ हजार एटीएम मार्चपर्यंत सुरू होणार

आयातीत घट -

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये लक्षणीय घट नोंदवली गेली. 9.28 अब्ज डॉलर्स किंमतीच्या सोन्याची आयात करण्यात आली. मागील आर्थिक वर्षाच्या तत्सम कालावधीपेक्षा ही आयात 47.42 टक्क्यांनी कमी आहे. कोरोना महामारी आणि जागतिक बाजारपेठचा सोन्यासह चांदीच्या दरावर परिणाम होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details