महाराष्ट्र

maharashtra

सोन्याच्या दरात किंचित घसरण; चांदी प्रति किलो ९५ रुपयांनी महाग

By

Published : Feb 16, 2021, 5:26 PM IST

सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी चांदीचे दर वधारले आहेत. चांदीचे दर प्रति किलो ९५ रुपयांनी वधारून ६९,५३० रुपये आहेत.

सोने किंमत घसरण
सोने किंमत घसरण

नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा (१० ग्रॅम) ९ रुपयांनी घसरून ४६,९०० रुपये आहेत. जागतिक बाजारातील स्थितीने सोन्याच्या दरात बदल झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हचले आहे.

मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,९०९ रुपये होता. सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी चांदीचे दर वधारले आहेत. चांदीचे दर प्रति किलो ९५ रुपयांनी वधारून ६९,५३० रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६९,४३५ रुपये होता.

हेही वाचा-एलजी इलेक्ट्रॉनिक्सने केली नवीन ओलेड श्रेणीतील टीव्हीची घोषणा

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले की, दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत ९ रुपयांनी कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून प्रति औंस १,८२१ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २७.६० वर स्थिर राहिले आहे.

हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या महगाईचा 'भडका' थांबेना...सलग आठव्या दिवशी दरवाढ

आयातीत घट -

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये लक्षणीय घट नोंदवली गेली. ९.२८ अब्ज डॉलर्स किंमतीच्या सोन्याची आयात करण्यात आली. मागील आर्थिक वर्षाच्या तत्सम कालावधीपेक्षा ही आयात ४७.४२ टक्क्यांनी कमी आहे. कोरोना महामारी आणि जागतिक बाजारपेठेचा सोन्यासह चांदीच्या दरावर परिणाम होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details