महाराष्ट्र

maharashtra

कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात टंचाई भासू देणार नाही; सौदी अरेबियाचे भारताला आश्वासन

By

Published : Sep 16, 2019, 7:30 PM IST

सौदी कंपनी अॅरॅम्कोच्या दोन तेल प्रकल्पावर हल्ले झाल्यानंतर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट केले. सरकारी  कंपन्यांकडील असलेल्या संपूर्ण कच्च्या तेलाच्या साठ्याचा आढावा घेण्यात आला आहे. धर्मेद्र प्रधान म्हणाले,  आम्हाला विश्वास आहे, भारताला होणारा तेल पुरवठा विस्कळित होणार नाही. आम्ही  परिस्थितीवर  निगराणी करत आहोत.

प्रतिकात्मक - कच्चे तेल उत्पादन प्रकल्प

नवी दिल्ली - जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कच्च्या तेलाचा ग्राहक असलेल्या भारताच्या तेल पुरवठ्यात सौदीकडून कसलाही अडथळा येणार नाही. याबाबत भारताचा क्रमांक २ चा तेल पुरवठा करणाऱ्या सौदीने आश्वासन दिल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

सौदी कंपनी अॅरॅम्कोच्या दोन तेल प्रकल्पावर हल्ले झाल्यानंतर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट केले. सरकारी कंपन्यांकडील असलेल्या संपूर्ण कच्च्या तेलाच्या साठ्याचा आढावा घेण्यात आला आहे. धर्मेद्र प्रधान म्हणाले, आम्हाला विश्वास आहे, भारताला होणारा तेल पुरवठा विस्कळित होणार नाही. आम्ही परिस्थितीवर निगराणी करत आहोत.

अॅरॅम्कोच्या अधिकाऱ्यांनी भारतीय तेल कंपन्यांना होणाऱ्या पुरवठ्यात कपात होणार नसल्याचे सांगितले आहे. ही माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी (१५ सप्टेंबर) दिली होती.

जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर भडकले-
तेल प्रकल्पावरील हल्ल्यानंतर सौदीच्या एकूण तेल उत्पादनात ५० टक्के घट झाली आहे. देशाच्या एकूण गरजेपैकी ८३ टक्के कच्चे तेल आयात करण्यात येते. इराकनंतर सौदी अरेबिया भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश आहे. सौदी अरेबियाने भारताला आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ४०.३३ दशलक्ष टन विकले आहे. ब्रेंड क्रुडमध्ये कच्च्या तेलाचे दर हे प्रति बॅरल ७१.९५ डॉलरने वाढले आहेत. कच्च्या तेलाचे ट्रेडिंग होत असताना १९८८ पासून डॉलरच्या तुलनेत सर्वात अधिक वाढलेले दर आहेत.

...तर भारताला सर्वात अधिक फटका बसणार-

वूड मॅकन्झी संशोधन संचालक विमा जयाबालन यांनी पुढील आठवड्यापर्यंत सौदीकडे राखीव तेलसाठा असल्याचे सांगितले. मात्र हीच परिस्थिती कायम राहिली तर कच्च्यात तेलाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होवू शकतो, असे त्यांनी सांगितले. आशियामध्ये सर्वात अधिक चीन आणि जपान हे देश सौदीकडून सर्वात अधिक दररोज ९०० ते १ हजार १०० बॅरल रोज घेतात. त्यामुळे कच्च्या तेलाचा साठा कमी असेल तर त्याचा सर्वात फटका भारताला बसेल, असेही त्यांनी सांगितले.

Intro:Body:Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details