महाराष्ट्र

maharashtra

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आरबीआयकडे केवळ व्याजदराचे साधन नाही - शक्तिकांत दास

By

Published : Feb 6, 2020, 2:20 PM IST

उत्पादन कमी राहिल्याने अर्थव्यवस्थेच्या विकासदरात  घसरण झाल्याचे   केंद्रीय मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता आरबीआयने लवचिक धोरण स्वीकारले आहे. आरबीआयने रेपो दर ५.१५ टक्के कायम ठेवला आहे.

monetary committee
आरबीआय पतधोरण समिती

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दर 'जैसे थे' ठेवला आहे. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आरबीआयकडे व्याजदराशिवाय इतर साधने असल्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. ते पतधोरण जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२१ मध्ये राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकासदर ६ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला. मात्र, महागाई ही अनिश्चित पद्धतीने वाढल्याने म्हटले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ३१ जानेवारीला चालू वर्षातील विकासदर ६.१ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. सांख्यिकी कार्यालयाने मे २०१९ मध्ये चालू वर्षातील विकासदर हा ६.८ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता.

हेही वाचा-आरबीआयकडून ५.१५ टक्के रेपो दर 'जैसे थे'

उत्पादन कमी राहिल्याने अर्थव्यवस्थेच्या विकासदरात घसरण झाल्याचे केंद्रीय मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता आरबीआयने लवचिक धोरण स्वीकारले आहे. आरबीआयने रेपो दर ५.१५ टक्के कायम ठेवला आहे.

हेही वाचा-...तर कोरोनाचा देशातील वाहन उद्योगावरही परिणाम होण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details