महाराष्ट्र

maharashtra

जीएसटी करसंकलन मासिक १.१ लाख कोटी रुपये हवे; वित्तमंत्रालयाकडून उद्दिष्ट निश्चित

By

Published : Dec 18, 2019, 3:19 PM IST

कर संकलनाच्या प्रयत्नांवर वैयक्तिकपणे देखरेख करण्यासाठी महसूल सचिव हे कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत.

GST collection target
जीएसटी करसंकलन उद्दिष्ट

नवी दिल्ली - केंद्र सरकारचे जीएसटीचे (वस्तू व सेवा कर) वार्षिक उद्दिष्ट हुकणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय वित्त मंत्रालयाने दर महिन्याला १.१ लाख कोटींचे जीएसटी संकलित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी प्राप्तिकर अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मंगळवारी बैठक घेतली. पांडे यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करातून कर संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना प्राप्तिकर अधिकाऱ्यांना दिल्या. स्थानिक मोहीम आखताना करदाते संकटात येणार नाही, याची काळजी घेण्याची पांडे यांनी प्राप्तिकर अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. कर संकलनाच्या प्रयत्नांवर वैयक्तिकपणे देखरेख करण्यासाठी महसूल सचिव हे कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत.

हेही वाचा-जीएसटी परिषदेची आज बैठक; वस्तू व सेवा कराचे दर वाढणार?

करसंकलन कमी झाल्याने राज्यांचा रखडला जीएसटी मोबदला-

गेल्या काही महिन्यात जीएसटी करसंकलन १ लाख कोटींहून कमी झाले आहे. केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये आर्थिक सुधारणांसाठी कॉर्पोरेट कर हा ३० टक्क्यांवरून २२ टक्के केला आहे. त्यामुळे सरकारला एकूण १.४५ लाख कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. जीएसटीचे करसंकलन कमी झाल्याने राज्यांना देण्यात येणारा जीएसटी मोबदला रखडल्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच कबुली दिली आहे.

हेही वाचा-तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मारता ? शिवसेनेचा मोदींना सवाल

Dummy news


Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details