महाराष्ट्र

maharashtra

जेटच्या २ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना स्पाईसजेट देणार नोकरी

By

Published : Jun 2, 2019, 4:50 PM IST

स्पाईसजेट ही देशातील चौथ्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. कंपनीमध्ये १४ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तर कंपनीकडे १०० विमाने आहेत.

स्पाईसजेट

सेऊ- जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यानंतर नोकरी गमाविलेल्या कर्मचाऱ्यांना स्पाईसजेट कंपनीकडून मोठा दिलासा मिळणार आहे. स्पाईसजेट जेटच्या २ हजार कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार आहे.

स्पाईसजेटचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांना कंपनीच्या विस्ताराबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की स्पाईसजेटने यापूर्वी जेट एअरवेजची २२ विमाने खरेदी केली आहेत. आम्ही मोठ्या प्रमाणात जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना नोकरीत घेणार आहोत. यापूर्वी सुमारे १ हजार १०० लोकांना नोकरीत घेतले आहे. जेटचे वैमानिक, केबिन क्र्यू , सुरक्षा अधिकारी आदी कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देणार आहोत. चालू आर्थिक वर्षात क्षमतेच्या ८० टक्के विस्तार करणार आहोत. कंपनीची आर्थिक स्थिती चांगली असून फार थोडे कर्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पाईसजेट ही देशातील चौथ्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. कंपनीमध्ये १४ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तर कंपनीकडे १०० विमाने आहेत.

जेट एअरवेजचे आर्थिक संकट-
आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने जेटएअरवेजची विमान उड्डाणे थांबविण्यात आली आहेत. एसबीआयने सुरुवातीला कर्ज देण्याचे जाहीर केले होते. मात्र त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांच्यावर सरकारने लुकआऊट नोटीस जारी केली आहे. दुबईमार्गे लंडनमध्ये जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या गोयल यांना विमानतळ अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात रोखले होते.

Intro:Body:Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details