महाराष्ट्र

maharashtra

कोरोनाने ब्रेक: हिरो मोटोकॉर्पचे सर्व उत्पादन प्रकल्प चार दिवस राहणार बंद

By

Published : Apr 20, 2021, 10:58 PM IST

सर्व प्रकल्पांमधून ९० लाख वाहनांचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. हे सर्व प्रकल्प आणि जीपीसी हे २२ एप्रिल ते १ मे दरम्यान बंद राहणार आहे.

Hero MotoCorp
हिरो मोटोकॉर्प

नवी दिल्ली - देशातील सर्वाधिक मोठी दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पने तात्पुरत्या काळासाठी देशातील सर्व प्रकल्पांमधून उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ग्लोबल पार्ट्स सेंटरचाही (जीपीसी) समावेश आहे. कोरोनाचा देशात संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

हिरो मोटोकॉर्प कंपनीचे देशात सहा उत्पादन प्रकल्प आहेत, हरियाणामदील धारुहिया आणि गुरग्राम, आंध्र प्रदेशमधील हरिद्वार, राजस्थानमधील नीमराणा आणि गुजरातमधील हलोल यांचा ठिकाणी कंपनीचे उत्पादन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमधून ९० लाख वाहनांचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. हे सर्व प्रकल्प आणि जीपीसी हे २२ एप्रिल ते १ मे दरम्यान बंद राहणार आहे.

हेही वाचा-रिलायन्सचा संकटात मदतीचा हात; रोज ७०० टन ऑक्सिजनचे राज्यांना मोफत वाटप

या बंदच्या काळात कंपनीकडून आवश्यक असणारी दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. उत्पादन प्रकल्प बंद राहिले तरी मागणीवर परिणाम होणार नाही. कमी काळासाठी प्रकल्प बंद ठेवल्यानंतर पुन्हा नियमितपणे काम सुरू होणार आहे. यापूर्वीच कंपनीने कॉर्पोरेट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची संधी दिली आहे. फार कमी कर्मचारी विविध पाळ्यांध्ये कॉर्पोरेट ऑफिसमधून काम करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांकांत दिवसाखेर 243.62 अंशांची घसरण

महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती-

महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. राज्यात 15 दिवसांचे निर्बंध लागू केले असूनही होणारी रुग्णवाढ महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात 62 हजार 97 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. 519 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर सध्या 1.55 टक्के एवढा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details