महाराष्ट्र

maharashtra

हिरो मोटोकॉर्पची वाहने एप्रिलपासून महागणार

By

Published : Mar 23, 2021, 10:02 PM IST

वाहनांच्या सुट्ट्या भागांच्या किमती वाढल्याने वाहनांच्या किमती वाढणार असल्याचे हिरो मोटोकॉर्पने म्हटले आहे. ही माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे.

Hero MotoCorp
हिरो मोटोकॉर्प

नवी दिल्ली - हिरो मोटोकॉर्पने दुचाकीसह स्कुटरच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या वाहनांच्या किमती १ एप्रिल २०२१ पासून वाढणार आहेत.

वाहनांच्या सुट्ट्या भागांच्या किमती वाढल्याने वाहनांच्या किमती वाढणार असल्याचे हिरो मोटोकॉर्पने म्हटले आहे. ही माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे.

हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा ११६ रुपयांची वाढ; चांदीच्या दरात घसरण

वाहनांच्या किमती या जास्तीत जास्त २,५०० रुपयापर्यंत वाढविण्यात येणार आहे. या किमती विशिष्ट बाजारपेठ आणि मॉडेलनुसार वेगवेगळ्या असणार आहेत. कंपनीने ग्राहकांवर कमीत कमी परिणाम होईल, याची काळजी घेतल्याचेही हिरो मोटोकॉर्पने म्हटले आहे. मुंबई शेअर बाजारात हिरो मोटोकॉर्पचे शेअर ०.८३ टक्क्यांनी घसरून प्रति शेअर ३,०६७.१५ रुपये आहे.

हेही वाचा-लोकसभेत वित्तीय विधेयक २०२१-२२ मंजूर

दरम्यान, मारुती सुझुकी, निस्सान या चारचाकी कंपन्यांनीही १ एप्रिलपासून वाहनांच्या किमती वाढविण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details