महाराष्ट्र

maharashtra

हीरो मोटो कॉर्पकडून मॅस्ट्रो एज स्टील्थ लाँच; 'इतकी' आहे किंमत

By

Published : Oct 7, 2020, 7:41 PM IST

हीरो मोटोकॉर्पने मॅस्ट्रो एज स्कूटरचे नवे मॉडेल लाँच केले आहे. कंपनीकडून पुढील आठवड्यात दुचाकीचे आणखी मॉडेल लाँच करण्यात येणार आहेत.

संग्रहित
संग्रहित

नवी दिल्ली - टाळेबंदीचे नियम शिथील झाल्यानंतर देशातील वाहनांची बाजारपेठ सावरत आहे. अशातच देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हीरो मोटोकॉर्पने मॅस्ट्रो एज स्टील्थ स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरची किंमत ७२ हजार ९५० रुपये (एक्स शोरुम दिल्ली) आहे.

मॅस्ट्रो एज १२५ स्टील्थ स्कूटरला १२५ सीसीचे इंजिन आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमाप्रमाणे हे इंजिन बीएस-६ क्षमतेचे आहे. तर पॉवर आउटपूट हे ९ बीएचपी आहे.

हेही वाचा-सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून, घ्या आजचे दर

हीरो मोटोकॉर्पचे प्रमुख (विक्री आणि विक्री पश्चात सेवा) नवीन चौहान म्हणाले, की मॅस्ट्रो एज ही ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या ब्रँडमध्ये आम्ही नवीन भर घालत आहोत. येत्या काही आठवड्यात कंपनीकडून अनेक उत्पादने लाँच करण्यात येणार असल्याचे चौहान यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details