महाराष्ट्र

maharashtra

विदेशात जाण्याचा नरेश गोयलांचा प्रयत्न धुळीस, पत्नीसह अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात

By

Published : May 25, 2019, 7:52 PM IST

Updated : May 25, 2019, 9:03 PM IST

नरेश गोयल यांच्या विरोधात लूक आउट नोटीस निघाल्याने त्यांना देश सोडण्यावर बंदी होती.

नरेश गोयल

मुंबई - जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल व त्यांच्या पत्नी अनिता यांना देश सोडण्यापासून तपास अधिकाऱ्यांनी रोखले आहे. हे दोघेही मुंबई विमानतळावरून एमिरेट्सच्या विमानाने मुंबईहून दुबई येथे जाण्याच्या तयारीत होते.

नरेश गोयल व त्यांची पत्नी अनिता हे प्रवास करत असलेले विमान उड्डाण करण्याच्या तयारीत होते. यावेळी अधिकाऱ्यांनी विमान उड्डाण थांबविण्याचे आदेश दिले. त्यानंतर विमानतळ अधिकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. नरेश गोयल यांच्या विरोधात लूक आउट नोटीस निघाल्याने त्यांना देश सोडण्यावर बंदी होती. गोयल दाम्पत्य हे मुंबई विमानतळावरून दुपारी 3 वाजून 35 मिनिटांच्या बोईंग 777 च्या विमानाने दुबईला जाणार होते.

नरेश गोयल यांच्या जेट एअरवेज कंपनीने सरकारी बँकांचे कोट्यवधी रुपये थकविले आहेत. त्यामुळे कंपनीची सेवा बंद असल्याने हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

Intro:जेट एयरवेज चे माजी अध्यक्ष नरेश गोयल व त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना देश सोडण्यापासून रोखण्यात आले आहे. हे दोघेही मुंबई विमानतळावरून एमिरेट्स च्या विमान क्रमांक ek507 च्या विमानाने मुंबईहुन लंडन येथे जात होते. विमान उड्डाण करण्याच्या तयारीत असताना पुन्हा विमान बोलविण्यात आले. इमिग्रेशन च्या अधिकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. नरेश गोयल यांच्या विरोधात लूक आउट नोटीस निघाल्याने त्यांना देश सोडण्यावर बंदी होती.Body:नरेश गोयल व त्यांची पत्नी शनिवारी मुंबई विमानतळावरून बॉईन 777 च्या विमाने दुपारी 3 वाजून 35 मिनिटांच्या विमानाने लंडन ला जाण्याच्या तयारीत होते मात्र त्या आगोदरच त्यांना अडविण्यात आले आहे. Conclusion:
Last Updated :May 25, 2019, 9:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details