महाराष्ट्र

maharashtra

ग्रामीण भागात सेतू सुविधा केंद्रावर मिळणार इलेक्ट्रिक वाहने

By

Published : Feb 20, 2021, 8:37 PM IST

सीएससीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश त्यागी म्हणाले की, आम्ही ग्रामीण भागात रुरल ई-मोबिलिटी प्रोग्रम हा १०० सीसीएस केंद्रात लाँच केला आहे. त्यामधून लोकांना ई-स्कूटर आणि ई-रिक्षा मिळू शिकणार आहे.

e Mobility Programme
इलेक्ट्रिक वाहने प्रोत्साहन योजना

नवी दिल्ली - इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सीएसी ई-गव्हर्न्स सेतू सुविधा केंद्राने रुरल ई-मोबिलीटी प्रोग्रॅम नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेमधून कार्बनचे प्रदूषण कमी होणार आहे.

सीएससीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश त्यागी म्हणाले की, आम्ही ग्रामीण भागात रुरल ई-मोबिलिटी प्रोग्रम हा १०० सीसीएस केंद्रात लाँच केला आहे. त्यामधून लोकांना ई-स्कूटर आणि ई-रिक्षा मिळू शिकणार आहे. कंपनीने विविध ई-वाहन कंपन्या आणि वित्तीय संस्थांशी करार केला आहे. वित्तीय कंपन्यांकडून लोकांना ई-वाहने मिळण्यासाठी कर्ज मिळू शकणार आहे. तसेच चार्जिंग करण्यासाठी पायाभूत सुविधा सीएससीमध्ये सुरू करणार आहोत.

हेही वाचा-हुवाई स्मार्टफोनच्या उत्पादनात ५० टक्के करणार घट

सीएससी हा इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाचा स्पेशल पर्पोज व्हिकल म्हणजे विशेष उपक्रम आहे. या कार्यक्रमामुळे केवळ पर्यावरणाला फायदा नव्हे तर ग्रामीण भागात संपर्कयंत्रणेचे नवे माध्यम मिळणार आहे. योजनेच्या प्रसिद्धीसाठी रोडशो आणि दुचाकी रॅली संपूर्ण देशात काढण्यात येणार आहेत. येत्या शुक्रवारी मोठा रोडशो करण्यात येणार आहे.

हेही वाचा-आरबीआयचे डेक्कन अर्बन बँकेवर निर्बंध; केवळ हजार रुपये काढता येणार

ABOUT THE AUTHOR

...view details