महाराष्ट्र

maharashtra

रिल्सच्या लाँचिंगनंतर झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत वाढ; 100 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये समावेश

By

Published : Aug 8, 2020, 8:14 PM IST

फेसबुकने रिल्स ही इन्स्टाग्रामवरून लाँच केल्यानंतर फेसबुकच्या शेअरची किंमत 6 टक्क्यांनी वाढले आहेत. मार्क झुकेरबर्ग यांच्याकडे फेसबुकचा 13 टक्के हिस्सा आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

मार्क झुकेरबर्ग
मार्क झुकेरबर्ग

सॅनफ्रान्सिस्को– फेसबुकचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलर झाली आहे. टिकटॉकशी स्पर्धा करणारे रिल्स हे इन्स्टाग्रामवरून लाँच केल्यानंतर ही संपत्ती वाढली आहे.

फेसबुकने रिल्स हे इन्स्टाग्रामवरून लाँच केल्यानंतर फेसबुकच्या शेअरची किंमत 6 टक्क्यांनी वाढली आहे. मार्क झुकेरबर्ग यांच्याकडे फेसबुकचा 13 टक्के हिस्सा आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

100 अब्ज डॉलरची मालमत्ता असलेल्या क्लबमध्येही मार्क झुकेरबर्ग यांचा समावेश झाला आहे. या क्लबमध्ये अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांचा समावेश आहे. झुकेरबर्ग यांनी आयुष्यभरात स्वत:कडील मालकीचे 99 टक्के शेअर हे सामाजिक कार्यासाठी दान करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी मार्क यांनी पत्नी प्रिससिल्ला छॅन यांच्यासमवेत विश्वस संस्था स्थापन केली आहे.

अमेरिकेत टिकटॉकवर बंदी लागू करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय अनिश्चित असताना फेसबुकने इन्स्टाग्रामवर रिल्स सुरू केले आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना लहान व्हिडिओ, विविध इफेक्ट वापरून निमिर्तीक्षमता दाखविता येते.

दरम्यान, टिकटॉकने रिल्स ही टिकटॉकची नक्कल केल्याचा आरोप केला होता. तसेच अशा प्रकाराविरोधात लढणार असल्याचेही कंपनी म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details