महाराष्ट्र

maharashtra

तिरंगी मालिकेसाठी विंडीज संघाची घोषणा, गेल-रसेलची संघात निवड

By

Published : Apr 14, 2019, 7:21 PM IST

जेसेन होल्डरच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

विंडीजचा एकदिवसीय संघ

पोर्ट ऑफ स्पेन - विंडीज क्रिकेट बोर्डाने पुढील महिन्यात होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी विंडीज संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत बांगलादेश आणि आयर्लंड हे संघदेखील खेळणार आहेत. या संघात स्टार क्रिकेटर ख्रिस गेल, आंद्रे रसेल, अल्जारी जोसेफ आणि हेटमायर सारख्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. जेसेन होल्डरच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

या मालिकेसाठी रोस्टन चेज, डॅरेन ब्राव्हो, शाई होप आणि शेन डॉविच यांना संधी देण्यात आली. शॅनेन गेब्रियल याची बऱ्याच दिवसांनंतर संघात निवड करण्यात आली आहे. विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका महत्वाची असल्याचे क्रिकेट निर्देशत जिमी अॅडम्स यांनी सांगितले. यातील काही खेळाडू हे या मालिकेत आयपीएलमुळे सहभागी होऊ शकले नाहीत.

जेसन होल्डर, गेब्रियल आणि रोच यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार असेल. या मालिकेची सुरुवात ५ मेपासून होणार आहे. अंतिम सामना १७ मे रोजी होणार आहे.

विंडीजचा संघ
जेसन होल्डर (कर्णधार), जॉन कॅम्पबेल, डॅरेन ब्रावो, शाई होप, शेल्डन कॉटरेल, शेनन गेब्रिएल, केमार रोच, सुनील एंब्रिस, रेमंड रीफर, फेबियन अॅलेन, अॅश्ले नर्स, रॉस्टन चेस, शेन डॉरिच आणि जोनाथन कार्टर.

dummy


Conclusion:

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details