महाराष्ट्र

maharashtra

साताऱ्यात 18 जणांना मॉर्निंग वॉक भोवला; 3 दुकानदारांवरही कारवाई

By

Published : Apr 26, 2021, 3:19 PM IST

खिंडवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या 18 जणांवर आणि यवतेश्वर, अंबवडे तसेच सातारा परिसरात दुकाने उघडी ठेवणाऱ्या तीन दुकानदारांवर, अशा एकूण 21 जणांवर सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Shahupuri police station
शाहूपुरी पोलीस ठाणे

सातारा -शहर आणि परिसरात कोरोना वाढत असताना मॉर्निंग वॉकसाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि दुकानेही उघडे ठेवू नयेत, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. यादरम्यान, खिंडवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या 18 जणांवर आणि यवतेश्वर, अंबवडे तसेच सातारा परिसरात दुकाने उघडी ठेवणाऱ्या तीन दुकानदारांवर, अशा एकूण 21 जणांवर सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

बंदी आदेशाचे उल्लंघन -

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये सुरज शरद पोळ (गोळीबार मैदान), शुभम मोहन घोरपडे (शाहूनगर गोडोली), अनिल डांगे (शाहूनगर), प्रथमेश सुनील भोसले (त्रिमूर्ती कॉलनी गोडोली), ऋषिकेश अंकुश गायकवाड (विलासपूर), ओमकार जांभळे, शुभम सुनील लोंढे (शाहूनगर), अमित सुधाकर आपटे (रामाचा गोट), अमितराव शंकरराव जाधव (साईबाबा मंदिर गोडोली), दिलीप दादासाहेब जोशी (साईबाबा मंदिर गोडोली), योगेश सुरेश तारळकर (रामाचा गोट), अथर्व रमेश बर्गे (प्रताप कॉलनी एमआयडिसी), विशाल लालासाहेब जगदाळे (कर्मवीर नगर), अजिंक्य रामचंद्र बाबर (विसावा नका गोरखपुर), अनिल डांगे (शाहूनगर) यांचा समावेश असून या सर्वांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या देशाचे उल्लंघन केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुकानदारांवरही कारवाई -

दरम्यान, राहुल बाळासाहेब पवार (यवतेश्वर ता. सातारा) यांनी नीलम मसाला ड्रायफ्रूट दुकान तर संतोष किसन जाधव (रा. आंबवडे ता. सातारा), सुशील रामचंद्र गायकवाड (व्यंकटपुरा पेठ सातारा) यांनी रंगाचे दुकान सुरू ठेवल्या प्रकरणी त्यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details