महाराष्ट्र

maharashtra

शेतकर्‍यांचे सर्व अतिरिक्त दुध खरेदी होणार ; आमदार पाटील यांच्या प्रयत्नांना यश

By

Published : Feb 4, 2019, 12:41 PM IST

Updated : Feb 4, 2019, 12:57 PM IST

आमदार पाटील

2019-02-04 12:35:37

शेतकर्‍यांचे सर्व अतिरिक्त दुध खरेदी होणार ; आमदार पाटील यांच्या प्रयत्नांना यश

परभणी- जिल्ह्यातील शासकीय दुध डेअरीमार्फत शेतकर्‍यांची संकलीत केलेले अतिरीक्त सर्व दुध खरेदी करण्याचे आदेश दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिले. या संदर्भात परभणीच्या शासकीय दूध डेअरी मध्ये आमदार डॉ.राहुल पाटील यांनी आंदोलन करून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला होता.

एमआयडीसी स्थित शासकीय दुध संकलन केंद्रामार्फत प्रतिदिन केवळ 35 हजार लिटर दुध खरेदी करण्याचे आदेश या विभागाचे आयुक्त गोयल यांनी काढल्यामुळे जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकरी संकटात सापडले होते. सध्याच्या हंगामात शेतकर्‍यांकडून दररोज 60 ते 70 हजार लिटर दुध विक्रीसाठी आणले जात असताना वरील आदेशामुळे अतिरीक्त दुध करण्यास संकलन केंद्राचे अधिकारी नकार देत असत. आ.डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वात दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने मुंबई गाठून परीवहन मंत्री दिवाकर रावते व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांची भेट घेवून याबाबत आपले गार्‍हाणे मांडले. आ.डॉ. पाटील यांनी दुष्काळी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांनी दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा जोमाने सुरु केला असून त्यांनी उत्पादीत केलेले सर्व दुध खरेदी करण्याची शासनाची जबाबदारी आहे. गेल्या अनेक दिवसापांसून शेतकर्‍यांचे हजारो लिटर दुध शासनाने खरेदी न केल्यामुळे शेतकरी वर्गात सरकारच्या विरोधात असंतोष असल्याचे निदर्शनास आणून दिले.

शेतकर्‍यांची ही अडचण लक्षात घेवून दुग्ध विकास मंत्री जानकर यांनी तात्काळ अर्थ खात्याचे सचिव अनुपकुमार यांच्याशी चर्चा करून दुध उत्पादक शेतकर्‍यांचे अतिरीक्त सर्व दुध प्रतिदिन खरेदी करण्याचे आदेश दिले. आ. डॉ. राहुल पाटील यांच्या समवेत यावेळी विठ्ठलराव गिराम, एकनाथ घांडगे, राजेश सोळंके, गणेश काळे, कृष्णा शिंदे, अनिल देशमुख, विलास रासवे, गोपाल होगे, दत्ता मायंदळी, आनंद पठाडे, रामप्रसाद गमे, जयराम गिराम, बाळासाहेब देशमुख एकनाथ भालेराव, विष्णू सुर्यवंशी, भास्कर मुंडे, लक्ष्मण लांडगे, रामप्रसाद पावडे, सोमेश्‍वर शिंदे आदी दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. दुग्ध विकास मंत्र्यांच्या आदेशावर समाधान व्यक्त करीत शेतकर्‍यांनी आ.डॉ. राहुल पाटील, परीवहन मंत्री दिवाकर रावते आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांचे आभार मानले.
 

Intro:परभणी - जिल्ह्यातील शासकीय दुध डेअरीमार्फत शेतकर्‍यांची संकलीत केलेले अतिरीक्त सर्व दुध खरेदी करण्याचे आदेश दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिले. या संदर्भात परभणीच्या शासकीय दूध डेअरी मध्ये आमदार डॉ.राहुल पाटील यांनी आंदोलन करून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला होता. Body:येथील एमआयडीसी स्थित शासकीय दुध संकलन केंद्रामार्फत प्रतिदिन केवळ 35 हजार लिटर दुध खरेदी करण्याचे आदेश या विभागाचे आयुक्त गोयल यांनी काढल्यामुळे जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकरी संकटात सापडले होते. सध्याच्या हंगामात शेतकर्‍यांकडून दररोज 60 ते 70 हजार लिटर दुध विक्रीसाठी आणले जात असताना वरील आदेशामुळे अतिरीक्त दुध करण्यास संकलन केंद्राचे अधिकारी नकार देत असत. आ.डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वात दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने मुंबई गाठून परीवहन मंत्री दिवाकर रावते व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांची भेट घेवून याबाबत आपले गार्‍हाणे मांडले. आ.डॉ. पाटील यांनी दुष्काळी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांनी दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा जोमाने सुरु केला असून त्यांनी उत्पादीत केलेले सर्व दुध खरेदी करण्याची शासनाची जबाबदारी आहे. गेल्या अनेक दिवसापांसून शेतकर्‍यांचे हजारो लिटर दुध शासनाने खरेदी न केल्यामुळे शेतकरी वर्गात सरकारच्या विरोधात असंतोष असल्याचे निदर्शनास आणून दिले.Conclusion:शेतकर्‍यांची ही अडचण लक्षात घेवून दुग्ध विकास मंत्री जानकर यांनी तात्काळ अर्थ खात्याचे सचिव अनुपकुमार यांच्याशी चर्चा करून दुध उत्पादक शेतकर्‍यांचे अतिरीक्त सर्व दुध प्रतिदिन खरेदी करण्याचे आदेश दिले. आ. डॉ. राहुल पाटील यांच्या समवेत यावेळी विठ्ठलराव गिराम, एकनाथ घांडगे, राजेश सोळंके, गणेश काळे, कृष्णा शिंदे, अनिल देशमुख, विलास रासवे, गोपाल होगे, दत्ता मायंदळी, आनंद पठाडे, रामप्रसाद गमे, जयराम गिराम, बाळासाहेब देशमुख एकनाथ भालेराव, विष्णू सुर्यवंशी, भास्कर मुंडे, लक्ष्मण लांडगे, रामप्रसाद पावडे, सोमेश्‍वर शिंदे आदी दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. दुग्ध विकास मंत्र्यांच्या आदेशावर समाधान व्यक्त करीत शेतकर्‍यांनी आ.डॉ. राहुल पाटील, परीवहन मंत्री दिवाकर रावते आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांचे आभार मानले.
गिरीराज भगत, परभणी
Last Updated :Feb 4, 2019, 12:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details