महाराष्ट्र

maharashtra

Goa Election : तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? - उत्पल पर्रीकर

By

Published : Jan 14, 2022, 10:25 AM IST

Updated : Jan 14, 2022, 11:50 AM IST

Fadnavis / Parrikar

पणजीच्या उमेद्वारीवरून ( Panaji's candidature ) आता उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असा नवा वाद रंगलाय केंद्रिय मंत्री अमित शहा (Union Minister Amit Shah) यांनी समजावऊन देखील पर्रीकर निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. फडणवीस यांनी त्यांच्या उमेदवारी भाष्य केले त्याला पर्रीकरांनी थेट उत्तर देत तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देताय मग मला का नाही असा सवाल केला आहे.

पणजी:पणजीतून भाजपने आमदार बाबुश मोंसरात याना तिकीट देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे नाराज झालेले माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकरयांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र परिकर यांनी निवडणूक लढवु नये यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिकर यांना दिल्लीत बोलावून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

फडणवीस / पर्रीकर

याविषयी गोवा राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत विचारले असता, फडणवीस म्हणाले की उत्पल हे केवळ मनोहर पर्रीकरयांचा मुलगा आहे म्हणून पक्ष त्यांना तिकीट देणार नाही, उत्पल यांची वेगळी ओळख आणि कामही नसल्याचे ही फडणवीस म्हणाले

फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केल्या नंतर त्याला उत्पल पर्रीकर यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हणले आहे की, तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पणजीतून तिकीट देऊ शकतात तर माझ्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला तिकीट का नाही देऊ शकत.

पणजी मतदारसंघात मागच्या 30 वर्षांपासून भाजपची सत्ता होती. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र 2019 ला पर्रीकरांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँगेसचे बाबुश मोंसरात यांचा विजय झाला. मात्र बाबुश पुढे भाजपवासी झाले. मात्र 2022 च्या निवडणुकीत आपल्याला भाजपकडून उमेदवारी पाहिजे नाहीतर आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले होते. मनोहर पर्रीकर यांनी पणजीत केलेली विकासकामे, पणजीतून त्यांना मानणारा त्यांचा मतदारवर्ग आणि पणजी आणि गोव्यासाठी त्यांचे असलेले योगदान याच्या जोरावर त्यांचे पुत्र उत्पल भाजपकडून पणजीसाठी तिकीट मागत आहेत.

Last Updated :Jan 14, 2022, 11:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details