महाराष्ट्र

maharashtra

Wrestlers Protest: ब्रिजभूषण सिंहला अटक होणार?  अनुराग ठाकूर यांच्या घरी कुस्तीपटुंची बैठक सुरू

By

Published : Jun 7, 2023, 11:21 AM IST

Updated : Jun 8, 2023, 6:18 AM IST

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधा कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. शनिवारी केंद्रीय गृहमंत्री यांच्या बैठकीनंतर आता पुन्हा त्यांना चर्चेसाठी बोलवण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर

नवी दिल्ली: गेल्या दिवसांपासून कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोप आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांना पदावरुन हटवून त्यांना अटक केली जावी, अशी मागणी भारतीय कुस्तीपटूंकडून केली जात आहे. आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना केंद्र सरकराने पुन्हा एकदा चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी याची माहिती दिली आहे. सरकारकडून आलेली ऑफर कुस्तीपटूंनी स्वीकारली आहे. ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या घरी चर्चेसाठी पोहोचला आहे. दरम्यान सरकारकडून चर्चेसाठी आलेला प्रस्ताव कुस्तीपटूंनी स्वीकारला असून बृजभूषण शरण सिंह यांची अटकच झाली पाहिजे ही भूमिका ठाम असल्याचे कुस्तीपटू म्हणाले आहेत.

ट्विटमधून दिली माहिती : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ट्विटमध्ये म्हणाले की, सरकार कुस्तीपटूंशी त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. सरकारने पुन्हा एकदा कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. दरम्यान कुस्ती महासंघ ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी पुन्हा रेल्वेत आपली ड्युटी सुरू केली आहे. सर्व कुस्तीपटू या वर्षाच्या सुरुवातीपासून बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

पुन्हा चर्चेसाठी निमंत्रण : दरम्यान कुस्तीपटूंनी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्या बैठकीत सर्वकाही कायदेशीरपणे होईल, असे सांगितले होते. त्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनियाने या बैठकीची माहिती ट्विट करुन दिली होती. शनिवारी रात्री कुस्तीपटू आणि त्यांच्या प्रशिक्षकांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत गृहमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिले असे पुनियाने सांगितले होते. या बैठकीनंतर माध्यमात आंदोलन मागे घेण्यात आले आणि आंदोलनाचे नेतृत्व करणारे खेळाडूंनी पुन्हा नोकरी जॉईन केल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले होते. त्यानंतर पुन्हा आंदोलनाने जोर धरला. यानंतर केंद्राकडून चर्चेसाठी पुन्हा निमंत्रण देण्यात आले.

वर्षाच्या सुरुवातीपासून आंदोलन चालू : केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी आज परत ट्विट करत कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रण दिले. सरकार पैलवानांशी चर्चा करण्यास तयार आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा कुस्तीपटूंना निमंत्रित केले आहे,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. बृजभूषण शरण सिंह यांना त्यांच्या पदावरुन हटावावे आणि त्यांना अटक करण्यात यावी ही मागणी आंदोलक कुस्तीपटूंकडून केली जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट हे आंदोलन करुन सरकारवर दबाव टाकत आहेत.

नोकरीची भीती दाखवू नका : सोमवारी कुस्तीपटू आंदोलनातून माघार घेऊन रेल्वेतील नोकरीवर परतले अशा बातम्या माध्यमातून येत होत्या. कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी हे वृत्त फेटाळून लावले. याचबरोबर यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केले. त्यात त्यांनी न्यायासाठी आपण नोकरीवर पाणी सोडू शक्यतो असे म्हटले होते. त्यानंतर आणखीन एका ट्विटमध्ये पुनियाने देशवाशीयांना अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले होते. न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालू राहील असे सांगितले.

हेही वाचा -

  1. Wrestler Protest : तर भारतीय कुस्ती परिषद निलंबित करू, कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीची जागतिक कुस्ती संघटनेकडून दखल
  2. Wrestlers Protest : तर गंगेत आपली पदकांचे करणार अर्पण, कुस्तीपटूंचा निर्धार; दिल्लीगेटवर करणार प्राणांतिक आंदोलन
  3. Wrestlers Protest : पैलवानांनी धैर्य ठेवावे, खाप पंचायत पैलवानांच्या न्यायासाठी लढेल लढाई - नरेश टिकैत
Last Updated : Jun 8, 2023, 6:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details