महाराष्ट्र

maharashtra

ITTF World Team Championship : मनिका बत्राची निराशाजनक कामगिरी, भारतीय महिला संघाचा जर्मनीकडून पराभव

By

Published : Oct 1, 2022, 6:39 PM IST

Manika Batra
मनिका बत्रा ()

मनिका बत्रा ( Manika Batra ) जर्मनीच्या यिंग हानसमोर टिकू शकली नाही. जर्मन खेळाडूने भारतीय खेळाडूचा 3-0 (11-3 11-1 11-2) असा पराभव करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय पुरुष संघाने मात्र चांगली कामगिरी करत, गट 2 च्या सलामीच्या लढतीत उझबेकिस्तानचा 3-0 असा पराभव ( Indian mens team wins against Uzbekistan ) केला.

चेंगडू: श्रीजा अकुला ( Srija Akula ) आणि दिया चितळे ( Diya Chitale ) यांनी नेत्रदीपक विजय नोंदवले, परंतु स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्राने तिचे दोन्ही सामने गमावले. बात्राच्या पराभवामुळे शनिवारी ITTF वर्ल्ड टीम चॅम्पियनशिपच्या ( ITTF World Team Championship ) पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला जर्मनीकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला.

भारतीय पुरुष संघाने मात्र चांगली कामगिरी करत गट 2 च्या सलामीच्या लढतीत उझबेकिस्तानचा 3-0 असा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेती आणि जागतिक क्रमवारीत 44व्या स्थानी असलेल्या बात्राला जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या यिंग हानला पुढे टिकता आले नाही. जर्मन खेळाडूने भारतीय खेळाडूचा 3-0 (11-3 11-1 11-2) असा पराभव करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

जागतिक क्रमवारीत 77व्या क्रमांकावर असलेल्या श्रीजाने नंतर उच्च रँकिंग असलेल्या नीना मित्तलहमचा 3-0 (11-9, 12-10, 11-7) पराभव करून भारताला पुनरागमन करुन दिले. यानंतर जागतिक क्रमवारीत 122व्या क्रमांकावर असलेल्या दियाने सबाइन विंटर्सवर 3-1(11-9, 8-11, 11-6, 13-11) असा विजय नोंदवत भारताला आघाडी मिळवून दिली.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या बात्राने तिच्या दुसऱ्या सामन्यात दमदार सुरुवात केली, परंतु पहिला गेम जिंकूनही तिला जागतिक क्रमवारीत 14व्या क्रमांकावर असलेल्या मित्तलहमला कडून 1-3 (11-7, 6-11, 7-11, 8-11) पराभव पत्करावा लागला. यामुळे सामना 2-2 असा बरोबरीत होता. श्रीजाने निर्णायक सामन्यात यिंगकडून 0-3 (3-11 5-11 4-11) असा पराभव पत्करला. भारतीय महिला संघ पाचव्या गटात तिसऱ्या स्थानावर आहे.

तत्पूर्वी, भारतीय पुरुष संघाने उझबेकिस्तानविरुद्ध सहज विजयाची नोंद ( Indian mens team wins against Uzbekistan ) केली. हरमीत देसाईने एलमुरोड खोलिकोव्हचा 3-0 (11-9 11-9 11-1) पराभव केला, जी साथियानने अब्दुलअजीझ अनोरबोएवचा 3-0 (11-3 11-6 11-9) आणि मानव ठक्करने शोखरुख इस्कंदरचा 3-0 (11-9) पराभव केला. (11-8 11-5 11-5). या विजयासह भारत दुसऱ्या गटात जर्मनी आणि फ्रान्सच्या मागे तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय पुरुष संघाचा पुढील सामना जर्मनीशी तर महिला संघाचा सामना झेक प्रजासत्ताकशी होणार आहे.

हेही वाचा -National Games 2022 : गुजरातच्या इलावेनिल वालारिवनने पटकावले सुवर्णपदक, अ‍ॅथलेटिक्समधील मोडले गेले नऊ विक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details