महाराष्ट्र

maharashtra

WhatsApp services ठप्प झालेली व्हॉट्सअ‌ॅप सेवा पूर्ववत, वापरकर्ते झाले होते अस्वस्थ

By

Published : Oct 25, 2022, 1:05 PM IST

Updated : Oct 25, 2022, 2:33 PM IST

सतत आपल्याला व्हॉट्सअप ( WhatsApp services news ) पाहण्याची सवय असते. मात्र, गेली ३० मिनिटे जगभरात अनेक ठिकाणी व्हॉट्सअप सेवा बंद आहे.

WhatsApp services
व्हॉट्सअ‌ॅप सेवा बंद

नवी दिल्ली- सतत आपल्याला व्हॉट्सअ‌ॅप ( WhatsApp services news ) पाहण्याची सवय असते. मात्र, जगभरात अनेक ठिकाणी व्हॉट्सअप सेवा बंद झाली होती. देशातील काही शहरांत ही सेवा पूर्ववत झाल्याचे दिसत आहे. ऐन दिवाळीत सेवा ठप्प झाल्याने वापरकर्ते त्रस्त झाले होते.

वापरकर्त्यांनी ट्विटरवर समस्या मांडल्या : अनेक युजर्ससाठी व्हॉट्सअ‌ॅप डाऊन झाल्याचे दिसते. अनेक वापरकर्त्यांनी ट्विटरवर समस्या मांडल्या आहेत. व्हॉट्सअ‌ॅपवरून मेसेज मीडिया फाइल्स पाठवू शकत नाहीत. यापूर्वी ३ ऑक्टोबर २०२१ ला त्री 9.15 वाजताच्या सुमारास वव्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक बंद झाले होते. त्यानंतर फेसबुकचे सहसंस्थापक झुकरबर्गने माफी मागितली होती.

नुकतेच नवीन फीचर्स सुरू केले :व्हॉट्सअ‌ॅपने नुकतेच नवीन फीचर्स सुरू केले आहेत. व्हॉट्सॲप नेहमी वापरकर्त्यांसाठी सतत नवीन फीचर्स घेऊन येत ( whatsapp features ) असते. मजकूर पाठवण्याचा आणि अडचणी सोप्या करण्याचा प्रयत्न करत असते. मग तो एक चांगला व्हिज्युअल अनुभव असो किंवा चांगली गोपनीयता सेटिंग्ज असो, मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना त्याचा लाभ घेता ( whatsapp upcoming features ) येतो.

३ हजारांहून अधिक लोकांच्या तक्रारी :वेब आणि स्मार्टफोन या दोन्ही ठिकाणी तिन्ही अ‍ॅप चालत नाहीत. अँड्रॉइड, आयओएस आणि वेबवर तिन्ही अ‍ॅप ठप्प आहेत. लोकांनी पाठवलेले मॅसेज अर्ध्यावरच अडकले आहेत. डाउन डिटेक्टरवर 3 हजारांहून लोकांनी याबाबतच्या तक्रारी दिल्या आहेत. भारतात फेसबुकचे ४१० दशलक्षाहून अधिक, व्हॉट्सअ‍ॅपचे ५३० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. इन्स्टाग्रामचे भारतात २१० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे.

Last Updated :Oct 25, 2022, 2:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details