महाराष्ट्र

maharashtra

Wagh Bakri Chai CEO : 'वाघ बकरी चहा'च्या संचालकांचं निधन, भटक्या कुत्र्यांनी केला होता हल्ला

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 3:06 PM IST

Updated : Oct 23, 2023, 3:22 PM IST

Wagh Bakri Chai CEO : वाघ बकरी चहा समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचं एका दुर्दैवी अपघातात निधन झालं. त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता.

Wagh Bakri Chai CEO
Wagh Bakri Chai CEO

अहमदाबाद Wagh Bakri Chai CEO : भारतीय उद्योगपती आणि वाघ बकरी चहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचं वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झालं. पराग देसाई यांना ब्रेन हॅमरेज झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते आठवडाभर रुग्णालयात होते. रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी त्यांचं निधन झालं.

भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता : पराग देसाई हे १५ ऑक्टोबरला घराजवळ फिरायला गेले होते. दरम्यान, तेथील काही कुत्रे त्यांच्यावर भुंकायला लागले. कुत्र्याच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवत असताना ते घसरले आणि जमिनीवर पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. यानंतर त्यांना तात्काळ शेल्बी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना शस्त्रक्रियेसाठी झायडस रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे ते व्हेंटिलेटरवर होते. ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

चहाचा कौटुंबिक व्यवसाय होता : वाघ बकरी चहा हा गुजरातमधील प्रसिद्ध ब्रॅंड आहे. पराग देसाई हे या कंपनीच्या ६ ग्रुप डायरेक्टरपैकी एक होते. ते १९९० मध्ये त्यांच्या कौटुंबिक चहाच्या व्यवसायात सामील झाले. त्यांनी अमेरिकेतील लाँग आयलँड युनिव्हर्सिटीतून एमबीए पूर्ण केलंय. देसाई वाघ बकरी चहाची विक्री, विपणन आणि निर्यात हाताळायचे. असं म्हणतात की पराग देसाई यांना चहाची खूप आवड होती. त्यांचं कुटुंबं चार पिढ्यांपासून चहाच्या व्यवसायात आहे.

वाघ बकरी चहाच्या ब्रॅंडला मजबूत केलं : पराग देसाई १९९५ मध्ये वाघ बकरी चहासोबत जोडले गेले. त्यावेळी कंपनीची एकूण उलाढाल १०० कोटी रुपयांपेक्षाही कमी होती. पण आज त्यांची वार्षिक उलाढाल २००० कोटींच्या पुढे गेली आहे. वाघ बकरी चहा भारतातील २४ राज्यांसह जगातील ६० देशांमध्ये निर्यात केला जातो. ही देसाईंचीचं योजना होती, ज्यामुळे कंपनीचं ब्रँडिंग मजबूत झालं. ब्रँडच्या अनोख्या नावामुळेही लोकं या उत्पादनाशी जोडले गेले.

हेही वाचा :

  1. Maha First Agniveer Died : महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला वीरमरण; सियाचिनमध्ये बजावत होते कर्तव्य
  2. Akshay Gavate Died : सर्वांना अभिमान वाटावा असा अक्षय आम्हा सर्वांना सोडून गेला...म्हणत मित्रांना अश्रू अनावर!
Last Updated :Oct 23, 2023, 3:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details