महाराष्ट्र

maharashtra

Vaccination : लवकरच लहान मुलांचे लसीकरण, 'या' वयाच्या मुलांना मिळणार लस

By

Published : Oct 12, 2021, 1:56 PM IST

Updated : Oct 12, 2021, 3:53 PM IST

Covaxin

लवकरच केंद्र सरकार लहान मुलांच्या लसीकरणासंबंधित नियमावली जारी करणार आहे. काही महिन्यांपूर्वीच लहान मुलांवर कोवॅक्सीन (Covaxin) ची तपासणी केली जात होती. आतापर्यंत लशीची यशस्वीपणे चाचणीही झाली असल्याचे सूत्रांकडून समजते.

नवी दिल्ली -लवकरच देशात लहान मुलांचे कोरोना लसीकरण सुरू होऊ शकते. देशाच्या औषध प्रशासन DGCI ने भारत बायोटेकला कोवॅक्सीन (Covaxin) 2 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना लसीकरण देण्यासाठी शिफारस केली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांनी मिळून ही लस विकसित केली आहे.

लवकरच केंद्र सरकार लहान मुलांच्या लसीकरणासंबंधित नियमावली जारी करणार आहे. काही महिन्यांपूर्वीच लहान मुलांवर कोवॅक्सीन (Covaxin) ची तपासणी केली जात होती. आतापर्यंत लशीची यशस्वीपणे चाचणीही झाली असल्याचे सूत्रांकडून समजते. लवकरच लसीकरणाची प्रक्रिया, त्याची प्राथमिकता, दोन डोसमधील अंतर याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल.

CDSCO ला डेटा सादर

भारत बायोटेकने COVAXIN (BBV152) साठी 2-18 वर्षे वयोगटातील मुलांच्या क्लिनिकल चाचण्यांमधून संकलित केलेला डेटा CDSCO ला सादर केला आहे. सीडीएससीओ आणि विषय तज्ज्ञ समितीने (एसईसी) डेटाची चाचपणी केली आहे. आणि त्यानंतर सकारात्मक शिफारसी दिल्या आहेत. विषय तज्ञ समितीने (एसईसी) डीसीजीआय (ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) ला 2-18 वर्षांच्या मुलांसाठी भारतबायोटेकच्या COVAXIN (BBV152) वापरासाठी शिफारस दिल्याचे सूत्रांकडून समजते.

हेही वाचा -राज्यपालांच्या उपस्थितीत गडचिरोलीतून सीआरपीएफची सायकल रॅलीस प्रारंभ, रश्मी शुक्लांची होती उपस्थिती

Last Updated :Oct 12, 2021, 3:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details