महाराष्ट्र

maharashtra

Crime News : मैत्रिणीवर गोड बोलून बलात्कार, अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; आरोपीला पुण्यातून अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 1:22 PM IST

उत्तराखंड पोलिसांनी पुण्यातून एका तरुणाला अटक केलीय. या तरुणावर मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप आहे. वाचा पूर्ण बातमी.. (Pune crime news)

Uttarakhand Police arrested rape accused
Uttarakhand Police arrested rape accused

पिथौरागढ/पुणे : मुलीचं शारीरिक शोषण करून तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपीला उत्तराखंड पोलिसांनी पुण्यातून अटक केलीय. आरोपीला अटक करण्यासाठी पिथौरागढ पोलीस बऱ्याच दिवसांपासून त्याच्या मागावर होते. अखेर २७ ऑगस्ट रोजी पोलिसांना यश आलं. पोलिसांनी न्यायालयातून आरोपीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करून दहा हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं.

पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवले : पिथौरागढचे पोलीस अधीक्षक लोकेश्वर सिंह यांनी या प्रकरणी अधिक माहिती दिलीय. २६ जुलै २०२३ रोजी पीडितेने यासंबंधी पोलिसात तक्रार दिली होती. तिने तक्रारीत सांगितलं की, ती आरोपी मित्राला गेल्या २ वर्षांपासून ओळखते. दिदिहाट, जिल्हा पिथौरागढ येथील रहिवासी असलेल्या या आरोपीशी मैत्री झाली आणि त्यांचं बोलणं सुरू झालं. या दरम्यान आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी त्यानं तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवले.

जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न : यानंतर आरोपीने पीडितेला हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पीडितेने नकार दिल्यानंतर आरोपीने तिची बदनामी करण्याची धमकी दिली. याचा पीडितेला प्रचंड मानसिक त्रास होत होता. त्यामुळे व्यथित झालेल्या तरुणीने अखेर पोलिसांकडे धाव घेत या प्रकरणी तक्रार नोंदवली.

आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली : त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक केली. अटक टाळण्यासाठी आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता, असं पोलिसांनी सांगितलं. अटक करण्यात आल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केलं गेलं. त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हे ही वाचा :

  1. Sexual abuse students: महापालिकेच्या शाळेत ३ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण, पालकांनी चोप दिल्यानंतर पीटीच्या शिक्षकाला अटक
  2. Bihar Rape : आणखी एक 'निर्भया'! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून रस्त्याच्या कडेला फेकले; 72 तासांनी आली शुद्ध
  3. Old Man Murder Case Mumbai: वृद्धाची हत्या करून २ कोटींचा ऐवज लुटला; पोलिसांनी 'ही' युक्ती वापरून लावला शोध

ABOUT THE AUTHOR

...view details