महाराष्ट्र

maharashtra

Priyamvada Mhaddalkar : खचून जायचं नाही, मेहनतीचं फळ नक्कीच मिळतं; UPSC टॉपर प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या टिप्स

By

Published : Jun 2, 2022, 8:35 PM IST

Updated : Jun 2, 2022, 10:48 PM IST

यूपीएससीत मिळालेले यश आश्चर्याचा सुखद धक्का देणारे होते. रिजल्टमध्ये नाव आल्याचे समताच आनंदाआश्रू आले. या यशामुळे नक्कीच खूप आनंद झाला आहे. लहानपणापासून पाहिलेले स्वप्न साकार झाल्याचा आनंद आहे, अशी भावना प्रियंवदा म्हाडदळकर (Priyamvada Mhaddalkar) यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

Priyamvada Mhaddalkar
प्रियंवदा म्हाडदळकर

हैदराबाद - यूपीएससीत मिळालेले यश आश्चर्याचा सुखद धक्का देणारे होते. रिजल्टमध्ये नाव आल्याचे समताच आनंदाआश्रू आले. या यशामुळे नक्कीच खूप आनंद झाला आहे. लहानपणापासून पाहिलेले स्वप्न साकार झाल्याचा आनंद आहे, अशी भावना प्रियंवदा म्हाडदळकर (Priyamvada Mhaddalkar) यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या जाहीर झालेल्या निकालात मुंबईच्या प्रियंवदा यांनी देशात तेरावा क्रमांक पटकावला असून राज्यात प्रथम येण्याचा मान त्यांनी पटकावला (UPSC Maharashtra Topper Priyamvada Mhaddalkar) आहे. तसेच यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेच तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कानमंत्रही दिला आहे. खचून न जाता अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचेही प्रियंवदा यांनी सांगितले.

दुसऱ्याच प्रयत्नात मिळवले यश - प्रियंवदा म्हाडदळकर या इंजिनिअर आहेत. त्यानंतर त्यांनी बंगळुरूमधून एमबीएचे शिक्षण घेतले. बँकेत उच्च पदावर नोकरीवर त्या होत्या. मात्र, स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी यूपीएससीचा अभ्यास केला आणि स्वप्न साकार केले. मुंबईच्या प्रियंवदा यांनी दुसऱ्याच प्रयत्नात युपीएससी (UPSC Result 2021) परीक्षेत यश मिळवले. सध्या त्या हैदराबादमध्ये असतात.

हेही वाचा -यूपीएससी टॉपर प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या यशात वडिलांची प्रेरणा महत्वाची

प्रियंवदा यांचा प्रवास - प्रियंवदा यांचे (UPSC Topper Priyamvada Mhaddalkar) बालपण मुंबईत गेले. मुंबईतील डी.जी.रुपारेल महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. व्हीजेटीआयमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची पदवी घेतली. आयआयएम बंगळुरू येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणाच्या जोरावर त्यांनी बँकेत ६ वर्षे नोकरी केली. या बँकेत असिस्टंट व्हाईस प्रेसिंडेंट या पदावर कार्यरत त्या होत्या.

पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी - प्रियंवदा यांचे वडील सरकारी सेवेत कार्यरत होते. वडिलांकडूनच सरकारी सेवेत रुजू होण्याची प्रेरणा मिळाली, असे त्या सांगतात. सुरुवातीपासूनच पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी एकत्रच सुरू होती कारण विषय सर्व सारखेच असतात. पूर्व परीक्षेच्या आधी मॉक टेस्ट भरपूर दिल्या. MCQ चा सराव खूप केला. नियोजनबद्ध अभ्यास, सराव आणि वैकल्पिक विषयांवर भर दिला. अभ्यास करताना वैकल्पिक विषयाचा आवाका मोठा असल्याने त्यावर खूप भर दिला, भरपूर सराव आणि अभ्यासातला नियमितपणा हे यशाचे गमक असल्याचे त्यानी सांगितले आहे.

मुलाखतीची तयारी - पहिला भाग म्हणजे आपल्या पर्सनल डिटेलवर रिसर्च करावा लागतो. त्यावर सखोलमध्ये जाऊन अभ्यास केला. दुसरा भाग असतो तो करंट अफेयरचा, यासाठी मी रोज दोन न्यूजपेपर वाचायचे, जवळपास रोज दोन ते तीन तास मी न्यूजपेपरच वाचत होते. सुरुवातीला मी पेपर वरच्यावर वाचायचे मात्र मुलाखतीच्या दरम्यान त्याचे महत्त्व मला कळले आणि नंतर मी सखोलमध्ये न्यूजपेपर वाचायला सुरुवात केली आणि त्याचा मला फायदा झाला, असे प्रियंवदा यांनी सांगितले. तसेच या काळात रचकोंडाचे पोलीस आयुक्त सिनीयर आयपीएस अधिकारी महेश भागवत तसेच माझे कंपनीतील जुने सहकारी मनिष कुमार यांनीदेखील चांगले मार्गदर्शन केले आणि याचा फायदा झाल्याचे प्रियंवद यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

परीक्षेची तयारी करणाऱ्यांना टिप्स - रोज नियमितपणे अभ्यास करा, गॅप घेऊ नका. मी पण रोज आठ ते दहा तास अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होते. त्यात कधी कमी तर कधी जास्त वेळपण देत होते. सराव जास्त केला पाहिजे. मॉक टेस्टची तयारी करणे. तसेच आता बरेच टॉपर्स बरेच अॅडव्हाईस देत असतात. मात्र, मुलांनी तोच अॅडव्हाईस घ्यावा जो त्यांना सूट होईल. अपयश आले तरी खचून जायचे नाही, आपण जेवढी मेहनत करू तसे फळ मिळते, असे प्रियंवदा यांनी सांगितले.

हेही वाचा -UPSC Maharashtra Topper : लहानपणी पाहिलेले स्वप्न साकार झाले; प्रियंवदा म्हाडदळकर यांची विशेष मुलाखत

Last Updated : Jun 2, 2022, 10:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details