महाराष्ट्र

maharashtra

Crime News : 'असे कृत्य फक्त पशूच करू शकतो', 4 वर्षांच्या मुलीवर अमानुष बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा

By

Published : Jul 26, 2023, 7:20 PM IST

बुलंदशहरमध्ये चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायाधीशांनी एक टिप्पणीही केली आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाने अवघ्या 77 दिवसांत हा निकाल दिला आहे.

UP crime news
बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा

बुलंदशहर : जहांगीराबादमध्ये 4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्याला न्यायालयाने जलद सुनावणी करुन 77 दिवसांत फाशीची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच हे घृणास्पद कृत्य फक्त राक्षसच करू शकतो, अशी टिप्पणी न्यायाधीशांनी केली आहे. हा अत्यंत घृणास्पद गुन्हा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने दोषीला तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

बलात्कारानंतर मुलीची हत्या केली : सरकारी वकील वरुण कौशिक यांनी सांगितले की, 25 एप्रिल रोजी 40 वर्षीय फहीमने चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. यानंतर मुलीला बेदम मारहाण करून तिचे तोंड दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी 14 दिवसांत आरोपपत्र दाखल केले होते. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात होते.

आरोपीने अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या : वकिलांनी सांगितले की, मुलीवर ज्याप्रकारे बलात्कार झाला तो अतिशय घृणास्पद होता. हे काम एखाद्या पशूचे आहे असे वाटत होते. मुलीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तिच्या शरीरावर आठ ठिकाणी चावण्याच्या खुणा आढळल्या आहेत. तिच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या. मुलीच्या प्रायव्हेट पार्टलाही दुखापत झाली होती. मुलीचा मृतदेह पाहून तिच्यासोबत अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्याचे दिसत होते. या प्रकरणी न्यायालयात आठ साक्षीदार हजर करण्यात आले होते. या प्रकरणी बुधवारी न्यायालयाने दोषीला फाशीची शिक्षा सुनावली.

आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी : वकील अभिनव अग्रवाल यांनी सांगितले की, हे प्रकरण पॉस्को कोर्टात आहे. त्यात न्यायालयाने अवघ्या 77 दिवसांत निकाल दिला. यासोबतच दोषींला तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दोषीला शिक्षा झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत मुलीच्या आईने सरकारकडे, आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी केली आहे.

मुलीची अवस्था पाहताच आई बेशुद्ध पडली : मुलीच्या आईने सांगितले की, त्या दिवशी माझी मुलगी घराजवळ खेळत होती. काही वेळानंतर मी तिला पहायला आले, तर ती कुठेच नव्हती. गावात सगळीकडे बघितले, पण काही सापडले नाही. त्यानंतर एका गावकऱ्याने आम्हाला मुलीला फहीमसोबत पाहिल्याची माहिती दिली. आम्ही फहीमच्या घरी गेलो तेव्हा त्याच्या आईने आम्हाला परत पाठवले. मात्र त्यानंतर आम्ही बळजबरीने घरात घुसले असता मुलगी पलंगाखाली रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. तिचे सर्व कपडे फाटलेले होते. मुलीची अवस्था पाहून मी बेशुद्ध झाली, असे आईने सांगितले.

हेही वाचा :

  1. Crime News : धक्कादायक! अवघ्या 100 रुपयांसाठी बापाने पोराचा गळा चिरला!
  2. Crime News : BSF जवानाचे धक्कादायक कृत्य! एकाच कुटुंबातील चार जणांवर केला तलवारीने हल्ला
  3. Bihar Crime News : डान्सरचा 10 हजारात सौदा, 7 दिवस बंधक ठेवून केला 15 नराधमांनी बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details