महाराष्ट्र

maharashtra

Two leopards Death: विजेची तार अंगावर पडल्याने दोन मादी बिबट्यांचा मृत्यू

By

Published : Mar 20, 2023, 7:49 PM IST

राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यात रविवारी रात्री 11 लाईटची वायर तुटून पडली त्यामध्ये दोन मादी बिबट्या दगावल्या आहेत. मार्बल डंपिंग ग्राऊंडवर हो ही घटना घडली आहे. येथे अन्नासाठी किंवा पाण्याच्या शोधात असताना त्यांच्यावर ही वायर पडली असा प्रथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Two leopards Death
Two leopards Death

देवगड (राजस्थान) :राजस्थानमधील ही घटना आहे. यामध्येएक सहा वर्ष आणि दुसरा दोन वर्ष असे मादी बिबट्यांचे वय आहे. मोठ्या वादळ-वाऱ्यासह आलेल्या पावसात या दोन बिबट्यांच्या अंगावर वायर पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील कुंडवा गावात ही दुर्घटना घडली आहे. हे गाव जिल्ह्यातील देवगड उपविभागांतर्गत येते. यामध्ये या घटनेची दखल वन विभागाने घेतली असून त्यावर आता वनविभाग कोणती कारवाई करतो हे पाहणे महत्वाचे आहे.

वन्य प्राणी अन्न किंवा पाण्याच्या शोधात : रविवारी रात्री या प्रदेशात वादळी वाऱ्यामुळे 11 केव्ही हाय-होल्टेज पॉवरलाइन तुटली. याचदरम्यान जवळच असलेल्या मार्बल डम्पिंग ग्राऊंडवर लपून बसलेल्या दोन मादी बिबट्यांच्या अंगावर ही वायर पडली त्यामध्ये दोघींचाही मृत्यू झाला आहे. दोन्ही वन्य प्राणी अन्न किंवा पाण्याच्या शोधात बाहेर पडले होते. परंतु, दुर्दैवाने, लाईटची वायर त्यांच्यावर पडल्याने बिबट्यांचा मृत्यू झाला.

बिबटे बाहेर गेल्यावर त्या वायरच्या संपर्कात आले : रविवारी या भागात वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. सोसाट्याचा वारा सुटल्याने थेट वायर तुटली असती. कदाचित इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे वायर लिंक झाली असावी. हे दोन बिबटे बाहेर गेल्यावर त्या वायरच्या संपर्कात आले. त्यानंतर ही घटना घडली आहे. मादी बिबट्या आणि त्याच्या पिल्लाला विजेचा धक्का लागला, असे वनविभागाचे अधिकारी राजेंद्र सिंह चुंडावत यांनी सांगितले.

अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात : कुंडवा गावचे सरपंच काळूराम गुर्जर यांनी गावकरी करण शर्मा यांना घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेण्यास सांगितले. रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर घटनेला दुजोरा दिला. त्यानंतर देवघर वनविभागाचे रेंजर कमलेशसिंग रावत यांना बिबट्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली.

बिबट्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार : माहिती मिळताच वनपाल राजेंद्रसिंह चुंडावत यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी भेट दिली. दोन्ही बिबट्यांचे शव देवगड येथे शवविच्छेदनासाठी वनविभागाकडे पाठवण्यात आले. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर बिबट्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अशी माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा :Panipuri: दोन पंतप्रधान मित्रांची भेट अन् पाणीपुरी खात रंगलेल्या गप्पा, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details