महाराष्ट्र

maharashtra

Todays Top News in Marathi : आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर

By

Published : Jan 14, 2022, 6:03 AM IST

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

आजच्या टॉप न्यूज
आजच्या टॉप न्यूज

आज दिवसभरात -

  • बुली बाई प्रकरणातील दोन आरोपींना आज न्यायालयात आणणार

बुली बाई प्रकरणातील आरोपी श्वेता सिंग आणि मयंक रावत यांची आज पोलिस कस्टडी संपणार असून, त्यांना पुन्हा बांद्रा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. बुली बाई (Bully bai) गिटहब (GitHub) नावाच्या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. सोशल मीडियावरील लोकांच्या माहितीनुसार, हे अ‍ॅप उघडताच एका मुस्लिम महिलेचा चेहरा समोर येतो. याला बुली बाई असे नाव देण्यात आलं आहे. किंमत टॅगसह मुस्लिम महिलांचे आक्षेपार्ह फोटो शेअर केले आहेत. यासोबतच बुलीबाई या ट्विटर हँडलवरूनही त्याचा प्रचार केला जात आहे. या अ‍ॅपद्वारे मुस्लिम महिलांना बुक करता येईल, असे ट्विटर हँडलवर लिहिले आहे.

  • भाजपचे आणखी काही आमदार राजीनाम्याच्या तयारीत

उत्तर प्रदेशात भाजपला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. पक्षाचे अनेक मंत्री व आमदार हे पक्षावर आरोप करून राजीनामे देत आहेत. गेले चार दिवस तीन मंत्री आणि पाच आमदारांनी राजीनामे दिले आहेत. यापार्श्वभूमीवर भाजपचे काही आमदार आज राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

  • विशाल कुमार झा याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

बुली बाई ॲप प्रकरणातील ( Bully Bai app case) आरोपी विशाल कुमार झा (Accused Vishal Kumar Jha) याने जामीन मिळावा यासाठी वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज (Application for bail) केला आहे. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. विशाल कुमार झा ला 24 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावण्यात आली आहे.

  • तेलंगणात पाऊस आणि गारपीटचा इशारा

दक्षिण भारतातील राज्य असलेल्या तेलंगणामध्ये हवामान विभागामार्फत पुढील 2 दिवसांसाठी पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तेलंगणातील काही भागात गारपीट आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हैदराबाद येथील हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ धर्मा राजू यांनी ही माहिती दिली.

आजचे राशीभविष्य -

काल दिवसभरात -

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. 13 जानेवारी) भारतीय किसान युनियचे प्रवक्ते राकेश टिकैत यांची मुजफ्फरनगर येथील टिकैत यांच्या निवासस्थानी भेट ( Sanjay Raut Meets Rakesh Tikait ) घेतली. ही भेट आगामी विधानसभा निवडणुकीच्या ( Uttar Pradesh Assembly Election 2022 ) पार्श्वभूमीवर झाल्याचे संकेत राऊत यांनी दिले आहेत.

मुंबै बँकेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणुक पार ( Mumbai Bank President Election ) पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची अध्यक्षपदी तर भाजपाच्या विठ्ठल भोसले यांची उपाध्यक्ष पदी वर्णी ( Mumbai Bank President Siddharth Kamble ) लागली आहे. प्रसाद लाड यांचा दोन मतांनी पराभव ( Prasad Lad Defeated Mumbai Bank Election ) झाला आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील दोमोहानीमध्ये रेल्वेचा अपघात झाला आहे. माध्यमाच्या अहवालानुसार गुवाहाटी-बीकानेर एक्सप्रेस 15633 (अप) ( Guwahati Bikaner Express derailed ) चार ते पाच डब्बे रुळावर ( 5 coaches derailed ) उतरले आहे. ही घटना आज सायंकाळी 5 वाजता घडली आहे. या अपघातात 5 जण दगावल्याची माहिती ( deaths in Jalpaigur rail accident ) मिळाली आहे.

तिरुमला येथे मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तब्बल सहा तास दर्शनासाठी रांगेत थांबावे लागले. सहा तास पाणीही प्यायला नसल्याने भाविकांचा संताप दिसून आला. यावेळी भाविक व पोलिसांमध्ये शाब्दिक वाद पाहावयास मिळाला.भाविकांना पोलिसांनी मंदिर परिसरातून हुसकावून ( Tirumala Police Evacuated Devotees ) लावले.

2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 125 उमेदवारांना तिकीट दिले आहे. यावेळी काँग्रेसने ४० टक्के महिलांना तिकीट दिले असून, त्यात 'मिस बिकिनी गर्ल' आणि 'ग्रेट ग्रँड मस्ती' चित्रपटात बोल्ड सीन करणारी ही अभिनेत्री मेरठच्या हस्तिनापूर मतदारसंघातून ( Hastinapur Assembly constituency ) निवडणूक लढवणार आहे. बोल्ड सीन्स करणाऱ्या या बिकिनी गर्लला ( Bikini Girl ) काँग्रेसने दिले तिकीट, जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री...

ABOUT THE AUTHOR

...view details