महाराष्ट्र

maharashtra

Independence Day 2022 देशाचा आज 76 वा स्वातंत्र्यदिन पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार

By

Published : Aug 15, 2022, 6:49 AM IST

Updated : Aug 15, 2022, 6:56 AM IST

भारत आज आपला ७६ वा स्वातंत्र्यदिन 76th Independence Day of Indian Independence अत्यंत उत्साहात आणि देशभरात देशभक्तीच्या भावनेने साजरा करत आहे राजधानी दिल्लीत भव्य सोहळा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi Will Address The Nation ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत ते सलग नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकवतील आणि राष्ट्राला पारंपरिक भाषण देतील azadi ka amrit mahotsav देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 Years Of Independence Day केंद्र सरकारने सुरू केलेल्या हर घर तिरंगा Har Ghar Tiranga मोहिमेमुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असून देश तिरंगामय झाला आहे.

Independence Day
Independence Day

भारत आज आपला ७६ वा स्वातंत्र्यदिन 76th Independence Day of Indian Independence अत्यंत उत्साहात आणि देशभरात देशभक्तीच्या भावनेने साजरा करत आहे. राजधानी दिल्लीत भव्य सोहळा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi Will Address The Nation ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. ते सलग नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकवतील आणि राष्ट्राला पारंपरिक भाषण देतील. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 Years Of Independence Day केंद्र सरकारने सुरू केलेल्या हर घर तिरंगा Har Ghar Tiranga मोहिमेमुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असून देश तिरंगामय झाला आहे.

सरकारच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी हॉवित्झर तोफा, अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम (एटीजीएस), 21 तोफांची यंदा प्रथमच सलामी दिली जाणार आहे. या तोफा पूर्णपणे स्वदेशी आहे. DRDO ने डिझाईन आणि विकसित केली आहे. पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर आगमन झाल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यमंत्री अजय भट्ट आणि संरक्षण सचिव डॉ अजय कुमार त्यांचे स्वागत स्वागत करतील.

संरक्षण सचिव जनरल ऑफिसर कमांडिंग (GoC), दिल्ली एरिया, लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा, AVSM, यांची पंतप्रधानांशी ओळख करून देतील. GoC दिल्ली एरिया नंतर पंतप्रधान मोदींना सॅल्युटिंग बेसवर घेऊन जातील. संयुक्त इंटर-सर्व्हिसेस आणि दिल्ली पोलिस गार्ड पंतप्रधानांना सलामी देतील. त्यानंतर पंतप्रधान गार्ड ऑफ ऑनरचे निरीक्षण करतील.

हील इन इंडिया' उपक्रमांतर्गत देशाला वैद्यकीय आणि निरोगी पर्यटनासाठी जागतिक केंद्र म्हणून स्थान देण्याच्या उद्देशाने, वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी 12 राज्यांमधील 37 रुग्णालयांमध्ये वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढवण्यात येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 10 महत्त्वाच्या विमानतळांवर दुभाषी आणि विशेष डेस्क, एक बहुभाषिक पोर्टल आणि आंतरराष्ट्रीय रूग्ण आणि त्यांच्या साथीदारांसाठी सरलीकृत व्हिसा नियम हे देखील या उपक्रमाच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी आहेत.

अधिकृत सूत्रांनी सांगितले की, सरकारने 44 देशांची निवड केली आहे, प्रामुख्याने आफ्रिकन, लॅटिन अमेरिकन, सार्क आणि आखाती राष्ट्रे, जिथून मोठ्या संख्येने लोक वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येतात. या राष्ट्रांमध्ये उपचारांसाठी येणारा खर्च आणि दर्जा याचा देखील विचार करण्यात आला होता. त्यादृष्टीने ही योजना आखण्यात आली आहे. याचा उहापोह पंतप्रधान आजच्या आपल्या भाषणामधून करतील.

हेही वाचा -Independence Day भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास हर घर तिरंगा मोहिम वाचा सविस्तर

Last Updated :Aug 15, 2022, 6:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details