महाराष्ट्र

maharashtra

Today Top News : आज घडणाऱ्या घडामोडी; देशातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घ्या एकाच क्लिकवर

By

Published : Oct 3, 2022, 8:10 AM IST

जाणून घ्या आज काय असेल खास, दिवसभर या बातम्यांवर ( Todays Top News ) राहणार लक्ष. दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींवर असणार आपले लक्ष. क्रिडा ( T20 World Cup ) , सांस्कृतिक, राजकारण ( Bharat Jodo Yatra ), उत्सव ( IIFA Awards 2023 ) हे सर्व पाहा एकाच क्लिकवर. जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी.

Today Top News
आज घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी

आजच्या महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर; जाणून घेऊया देशातील महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर..

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2022 पुरस्कार :स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार 2022 मध्ये तेलंगणाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. तर हरियाणाने दुसरे पारितोषिक जिंकले. तेलंगणाने मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (SSG) 2022 चा पहिला पुरस्कार जिंकला आहे. हरियाणा दुसऱ्या तर तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे.

स्वच्छ भारत मिशन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा ( Bharat Jodo Yatra ) आजच टप्पा : सभेचा 'पवार पॅटर्न' आता देशातही चालला आहे. धो-धो पावसात राहुल गांधींचं भाषण झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या कर्नाटकात पोहोचली आहे. रविवारी राहुल गांधी यांनी कर्नाटकातील नंजनगुड येथील प्रसिद्ध प्राचीन श्रीकांतेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली. यानंतर सायंकाळी त्यांनी म्हैसूर येथील एपीएमसी मैदानावर सभेला संबोधित केले. यादरम्यान मध्येच जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र, राहुल गांधी यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. राहुल गांधी यांनी मुसळधार बरसणारा पाऊस अंगावर झेलत कर्नाटकाच्या म्हैसूरमध्ये भाषण केले. त्यांच्या या सभेचा व्हिडीओदेखील त्यांनी ट्विट केला आहे. यावेळी त्यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. भाषणानंतर त्यांनी भर पावसातच कार्यकर्त्यांची देखील भेट घेतली. राहुल गांधींच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत जोडो यात्रा - राहुल गांधी

16 संघ, 45 मैदाने, ऑस्ट्रेलियात रंगणार टी 20 चा ( T20 World Cup ) थरार तुम्हाला पाहता येणार :टी 20 क्रिकेट सामन्याचा थरार 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारत आणि पाकिस्तानसह 16 संघ मैदानात उतरणार आहेत. 45 मैदानावर विश्वचषकाची रणधुमाळी रंगणार आहे. भारत 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरोधात विश्वचषकाची सुरुवात करणार आहे. क्वालिफायर सामने 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. तर सुपर 12 चे सामने 22 ऑक्टोबरपासून रंगणार आहेत. क्रिकेटचे लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे पाहाल : भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर T20 वर्ल्ड कप 2022 चे सामने लाईव्ह पाहाता येणार आहेत. तर हॉटस्टारवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे टीम इंडियाचे सामने तसेच सेमीफायनल आणि फायनल सामना दूरदर्शनवर लाईव्ह पाहाता येणार आहेत.

टी 20 क्रिकेट

ठरलं! 'या' दिवशी पार पडणार ( IIFA Awards 2023 ) आयफा पुरस्कार 2023, यंदाही अबू धाबीमध्ये रंगणार सोहळा : 'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार' ( The International Indian Film Academy ) म्हणजेच आयफा पुरस्कार 2023 ( IIFA 2023 ) सोहळ्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. पुढच्या वर्षीचा म्हणजेच IIFA Awards 2023 हा पुरस्कार सोहळ्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ( IIFA 2023 Dates Announced ) झाल्या आहेत. 'आयफा' पुरस्कार 2023 फेब्रुवारी महिन्यात पार पडणार आहे. पुढच्या वर्षीचा पुरस्कार सोहळा अबुधाबीच्या यास बेटावर पार पडणार आहे. IIFA Awards 2023 हा पुरस्कार सोहळा 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार सोहळा अबुधाबी येथे पार पडणार आहे.

आयफा पुरस्कार

टांझानियाचा टिकटॉक स्टार जेव्हा ‘जय महाराष्ट्र’ म्हणतो! किली पॉलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय : सध्या सोशल मीडियावर अनेक परदेशी कलाकारांना भारतीय संस्कृती आणि इथल्या मनोरंजनाची आवड निर्माण झालेली पाहायला मिळते. अशाच स्टार्सपैकी एक आहे टांझानियाचा किली पॉल (Kili Paul). किली पॉल आणि त्याची बहीण निमा पॉल हे दोघेही भारतीय गाण्यांवर टिकटॉक व्हिडीओ बनवताना दिसतात. त्यांच्या या व्हिडीओंना सोशल मीडियावर प्रचंड लाईक्स मिळतात. भारतातही किलीचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकत्याच एका इव्हेंट दरम्यान किली पॉल भारतात आला होता. यावेळी त्याने चक्क मराठीत ‘जय महाराष्ट्र’ म्हटलं आहे. एका इव्हेंटसाठी भारतात आलेल्या किली पॉलने (Kili Paul) मराठमोळा गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) याच्याकडून मराठीचे धडे गिरवले आहेत. यावेळी राहुलने देखील त्याला मराठी भाषेत काही ओळी शिकवल्या. यावेळी किलीने राहुल वैद्यची मदत घेत ‘जय महाराष्ट्र’ म्हटले आहे. किलीच्या या व्हिडीओला सोशल मिडीयावर प्रचंड पसंती मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details