महाराष्ट्र

maharashtra

Kidney Sale : बायकोने मागितले 10 लाख रुपये; पठ्ठ्याने काढली थेट किडनी विक्रीला

By

Published : Feb 28, 2023, 9:44 PM IST

मंगळवारी बिहारमधील रहिवासी असलेल्या संजीव नावाच्या व्यक्तीने फरीदाबादमध्ये अनोखे प्रदर्शन केले. सासरचे लोक त्याचा छळ करत असल्याचा आरोप संजीवने केला आहे. यामुळे त्याला किडनी विकावी लागत आहे.

Kidney Sale
Kidney Sale

पत्नीच्या छळाला कंटाळून त्याने काढली किडनी विक्री

फरीदाबाद : हरियाणातील फरिदाबाद शहरात एक व्यक्ती बॅनर घेऊन फिरत आहे. ज्यावर 'किडनी विक्रीसाठी आहे' आणि 'आमरण उपोषण, 21 मार्च रोजी आत्मदहन समारंभ' असे लिहिले आहे. फोन नंबरपासून पत्त्यांपर्यंत काही चित्रे त्यावर लिहिलेली आहे. हे पोस्टर पाहून काही नागरिक वाचून पुढे जातात, तर काही लोक या व्यक्तीची व्यथाही ऐकतात. पोस्टरसह फरिदाबादमध्ये फिरणाऱ्या व्यक्तीचे नाव संजीव असून तो बिहारच्या पाटणा येथील रहिवासी आहे. संजीवच्या म्हणण्यानुसार, त्याची पत्नी आणि सासरच्यांनी त्याला हे सर्व करण्यास भाग पाडले.

काय आहे प्रकरण?-ईटीव्ही भारतनेही संजीवशी संवाद साधला तेव्हा त्यांने सासरचे लोक छळ करत असल्याचा आरोप संजीवने केला आहे. यात त्याची पत्नी, सासू, सासरे आणि भावजयांचा समावेश आहे. संजीवने सांगितले की, त्याची पत्नी त्याच्यावर घटस्फोट घेण्यासाठी दबाव आणत आहे. यासोबतच तिच्याकडून ५० हजार रुपयांची मागणी केली जात आहे. संजीवच्या म्हणण्यानुसार त्याच्याकडे दहा लाख रुपये पैस्याची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप. त्यामुळे दहा लाख रुपयांची मागणी पूर्ण करण्यासाठी संजीव वेगवेगळ्या राज्यात जाऊन किडनी विकण्याची जाहिरात करत आहे. जेणेकरून तो पत्नीला दहा लाख रुपये देऊन घटस्फोट देऊ शकेल.

घटस्फोट घ्यायचा नाही पण... : संजीवच्या म्हणण्यानुसार, त्याच्यावर पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून दबाव टाकण्यात येत आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या जामिनावर बाहेर आहे. हा खटला 6 वर्षांपासून सुरू असून आता पत्नी घटस्फोटासह 10 लाख रुपयांची मागणी करत आहे. संजीवच्या म्हणण्यानुसार, त्याला घटस्फोट घ्यायचा नाही, पण जर पत्नी राजी नसेल तर, तो किडनी विकून पैसे देण्यास तयार आहे. संजीवने सांगितले की, त्याला किडनीसाठी 8 लाख रुपये मिळत आहेत, परंतु त्याची मागणी 10 लाख रुपये आहे, कारण पत्नीकडून 10 लाख रुपये मागितले जात आहेत.

आत्मदहनाचा दिवस निश्चित : संजीव म्हणाले की, माझी किडनी 21 मार्चपर्यंत विकली तर, पैसे मी सासरच्यांना देईन. अन्यथा मी आत्महत्या करणार आहे. पोस्टरवर 21 मार्च रोजी आमरण उपोषण, आत्मदहन समारंभ असे लिहिले आहे. संजीव राष्ट्रपती, पंतप्रधान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह सर्व लोकांना या दिवसासाठी आमंत्रित करत आहेत. संजीव सांगतात की, मी अधिकार्‍यांकडे न्यायाची मागणी करत फिरलो, पण कोणीही माझे ऐकले नाही. पोलिस स्टेशनला अनेकदा भेटी दिल्या, मात्र कुठेही सुनावणी होत नाही. वैतागून मी हे पाऊल उचलले आहे. संजीवने सांगितले की, त्याचे ६ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याची पत्नी ४ महिन्यांची गरोदर असताना सासरच्यांनी तिचा गर्भपात केला. संजीव म्हणाले की, माझी पत्नी माझ्याकडे यावी, पण पत्नी यायला तयार नाही. तिला माझ्यापासून घटस्फोट हवा आहे. पैसे न देल्यास सर्वांना तुरुंगात डांबून टाकू, अशी धमकी सासू, सासरे, मेहुणे देत असल्याचे संजीवने सांगितले.

ईटीव्ही इंडियाशी संवाद साधताना संजीवने सांगितले की, तो किडनी विकण्याचे पोस्टर घेऊन पटनाच्या रस्त्यावर फिरत होता. त्यानंतर मी दिल्लीमार्गे हरियाणाला आलो. आता मी यूपीला जाणार आहे, ज्याला किडनी घ्यायची असेल त्यांनी मला १० लाख रुपये द्यावे. ते माझी किडनी 10 लाख रुपयाला विकल्यास मी माझ्या सासरच्या मंडळींना देईन. मी पैसे न देल्यास माझ्या कुटुंबावर हुंड्याचा गुन्हा दाखल करू, असे ते सांगत आहेत. सासरच्या लोकांनी संजीवविरोधात आधीच एफआयआर दाखल केली आहे.

बॅनरवर काय लिहिले आहे : संजीव हे बॅनर घेऊन रस्तायवर फिरत आहे. त्यावर 'ब्लॅकमेलर सासू, सासरे, पत्नीमुळे किडनी विक्रीसाठी असल्याचे लिहले आहे. यामध्ये संजीवने पत्नी, सासूचा फोटोही टाकला आहे. याशिवाय संजीवने पटनाचा पत्ता आणि फोन नंबरही दिला आहे, जेणेकरून लोक त्याच्याशी किडनीसाठी संपर्क करू शकतील. बॅनरच्या दुसऱ्या बाजूला संजीवने लिहिले आहे की, ब्लॅकमेलर पत्नी, भावजय, सासू आणि सासरे यांच्यामुळे आमरण उपोषण, आत्मदहन समारंभ, दिनांक २१ मार्च, सुरु करणार आहे. संजीव यांनी या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आमंत्रित केले आहे.

हेही वाचा -Robot Elephant : तुम्ही कधी रोबोटीक हत्ती पाहिला का? भारतात पहिल्यांदा धार्मिक विधी करण्यासाठी रोबोटीक हत्तीचा वापर

ABOUT THE AUTHOR

...view details